भन्नाट फीचर्ससह सुपर बाईक लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

इटालियन सुपर बाईक उत्पादक डुकाटीने आज इंडियन मार्केटमध्ये (launched)आपली नवीन बाईक 2025 Ducati Panigale V4 लाँच केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने या बाईकमध्ये अनेक प्रकारचे फीचर्स अॅड केले आहे. या बाईकची किंमत किती? रेंज किती आहे? जाणून घेऊ सविस्तर…

2025 Ducati Panigale V4: किती पॉवरफूल आहे इंजिन? :
कंपनीने Ducati Panigale V4 मध्ये 1103 सीसी क्षमतेचे लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. ज्यामुळे बाईक 216 हॉर्सपॉवरसह 120 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये अक्रापोविक एक्झॉस्ट देखील देण्यात आला आहे.
बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात डबल डिस्क ब्रेक, रायडिंगसाठी अनेक मोड्स तसेच पॉवर मोड्स, रेस ईसीबीएस, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, डुकाटी विली कंट्रोल, डुकाटी (launched)स्लाइड कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल, डुकाटी ब्रेक लाईट, चेन गार्ड, डुकाटी पॉवर लाँच, क्विक शिफ्टर, एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, स्टीअरिंग डँपर, ऑटो ऑफ इंडिकेटर, अँटी थेफ्ट, टीपीएमएससह टेम्परेचर सेन्सर, यूएसबी पोर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेटर, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन, 6.9 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रोड आणि ट्रॅक इन्फॉर्मेशन मोड्स अशी अनेक फीचर्स आहेत.
कंपनीने ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे, ज्यामध्ये Ducati Panigale V4 हा बेस व्हेरिएंट आहे आणि Ducati Panigale V4 S हा दुसरा व्हेरिएंट आहे. कंपनीने ही बाईक (launched)29.99 लाख रुपयांना लाँच केली आहे आणि याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 36.50 लाख रुपये आहे.
कंपनीने सांगितले की, ही बाईक पूर्णपणे सीबीयू म्हणून आणली जाईल आणि लाँच होण्यापूर्वीच याचे पहिले बॅच बुक करण्यात आले आहे. लाँच झाल्यापासून पहिल्या बॅचची डिलिव्हरी सुरू झाली आहे आणि दुसऱ्या बॅचसाठी बुकिंग देखील सुरू झाले आहे, जे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिल 2025 मध्ये सुरु होईल.2025 Ducati Panigale V4 इंडियन मार्केटमध्ये BMW S1000 RR, Kawasaki Ninja ZX-10R आणि Aprilia RSV 4 सारख्या बाईकशी स्पर्धा करते.
हेही वाचा :
सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार
कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!
बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….