रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (supplied)प्रत्यक्षात येथील शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे मोठे रुग्णालय आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक येथे उपचारासाठी येत असतात. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सखोल तपास केलयानंतर या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या की, तपासादरम्यान औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत ‘ॲझिथ्रोमायसिन’ हे औषध बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमधील चार पुरवठादारांकडून 50 लाखांहून अधिक टॅब्लेट खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर, या चौघांविरूद्ध भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक आणि दिशाभूल करून एखाद्याला वस्तू देण्यास प्रवृत्त करणे, बनावट औषध तयार करणे, इतर औषधाच्या नावाने बनावट औषध विकणे किंवा तयार करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (supplied) औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून द्विती त्रिवेरी, विजय चौधरी, सुरेश पाटील, मिहीर त्रिवेदी, या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर धापटे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही औषध बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. मात्र, ज्या रुग्णांना ही औषधे आतापर्यंत देण्यात आली आहेत त्यांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.या औषधांचे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवले असता ही बाब उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. लॅब टेस्ट दरम्यान औषधांच्या नावावर विष विकले जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर या बनावट औषधांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे देशात बिनदिक्कतपणे बनावट(supplied) औषधांची विक्री होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून याला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय या प्रकरणात पकडलेल्या लोकांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे.बीडमधील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला ईटेंडरकडून कोल्हापूरच्या एजन्सीकडून औषधांचा पुरवठा करण्यात आला. पण यात ॲझिमसीम 500 आणि ॲझिथ्रोमायसिन या औषधांची लॅब टेस्ट केल्यानंतर या टेस्टमध्ये ही औषधे बनावट असल्याचे आढळून आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य