भयंकर १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले

प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या (brother)१५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये भरले.प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे १५ वर्षीय मुलगी संतापली. तिने प्रियकराच्या मदतीने वडिलांसह लहान भावाची हत्या केली. इतकंच नाही, तर मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना १५ मार्च रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात घडली होती. याप्रकरणी दोन महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.

तिचा प्रियकर अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर रेल्वेत काम करणाऱ्या राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या ८ वर्षीय मुलाची १५ मार्च रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह राहत्या घरातील फ्रीजमध्ये आढळून आले होते.

मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. दुहेरी(brother) हत्याकांडाच्या या घटनेनं अख्खं शहर हादरवून गेलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. प्रेमसंबंधांना विरोध केल्याने दहावीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीनेच आपल्याच प्रियकराच्या मदतीने वडील आणि भावाची हत्या केल्याचं उघड झालं.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत अल्पवयीन मुलगी आणि तिचा (brother)प्रयकार मुकुल सिंह याचा शोध सुरू केला होता. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागत नव्हता. हा भयंकर गुन्हा करून अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. दोघेही विविध राज्यात फिरून पोलिसांना गुंगारा देत होते.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू