जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, चकमकीत भारतीय जवान शहीद

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(attack) भारतामध्ये संतापाचे वातावरण असतानाच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू होती. यामध्ये चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात चमकक सुरू होती.उधमपूरमध्ये काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांशी दोन हात करताना एका जवानाला वीरमरण आले आहे.

गुरुवारी सकाळी उधमपूर जिल्ह्यातील दुदू-बसंतगड परिसरात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण प्राप्त झालं आहे, तर काही जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण देशात संताप आणि शोक व्यक्त होत (attack)आहे. दोन दिवसांपूर्वीच पहलगामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप २८ पर्यटकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे संतापाची लाट असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोके वार काढले आहे. भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पण यामध्ये एका जवानाला वीरमरण आले.

गुप्तचर यंत्रणांकडून काही दहशतवादी या परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांना भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीमध्ये एका जवानाला वीरमरण आले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी (attack)ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.

दोन दिवसांपूर्वीच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील २८ जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये डोंबिवलीतील तीन जण, पुणे २ आणि पनवेलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात उधमपूरमध्ये दहशतवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक सुरू आहे.

हेही वाचा :

बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…

अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’

हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक

केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ

IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट