ठाकरे गटाचा पुन्हा ‘सांगली’ पॅटर्न! अंतिम चर्चेआधीच संजय राऊतांनी २ जागांवर दावा ठोकला
श्रीगोंदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे(political party) उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी श्रीगोंदा आणि अहमदनगर शहराच्या जागांवर ठाकरे गट लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नसताना राऊतांच्या या दाव्याने मविआमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वातावरण(political party) तापू लागले आहे आणि सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. विधानसभेपर्यंत आघाड्या अभेद्य राहतील की नाही, याबाबत चर्चा सुरू होण्याआधीच संजय राऊत यांनी दोन जागांवर दावा ठोकला आहे.
अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच असल्याचे स्पष्ट केले आहे आणि उमेदवार नंतर ठरवू असा संदेश दिला आहे. त्यामुळे सांगलीप्रमाणे पुन्हा एकदा मविआमध्ये वादाची ठिणगी पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
रविवारी ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; IMD कडून रेड अलर्ट जाहीर
…तर आमदारकीची निवडणूक लढवणार नाही; बच्चू कडूंनी घेतला मोठा निर्णय
आनंदाची बातमी! टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर लवकरच कमी होणार