हॉटस्पॉट न दिल्याने फायनान्स मॅनेजरला संपवलं

 पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर (manager)मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात अत्यंत खळबळजनक खुलासा झाला असून फक्त हॉटस्पॉट न दिल्याच्या रागातून कुलकर्णी यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भरचौकात हत्या झाल्याने पुणे शहर हादरुन गेले आहे. अशातच पुण्यामधून आणखी एक भयंकर घटना समोर आली असून हॉटस्पॉट न दिल्याच्या रागातून तिन अल्पवयीन मुलांसह चौघांनी मिळून एका फायनान्स मॅनेजरची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वासुदेव कुलकर्णी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आली आहे. फक्त हॉटस्पॉट न दिल्याच्या रागातून निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानेपुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

फक्त हॉटस्पॉटसाठी हत्या…

पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा खून करण्यात आला होता. वासुदेव कुलकर्णी असे मृत व्यक्तीचे नाव असून गाडीतळ परिसरात असलेल्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने कुलकर्णी यांच्यावर हल्ला करत त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येमागचे कारण अस्पष्ट असल्याने पोलीस तपास करत होते. या प्रकरणात अत्यंत खळबळजनक (manager)खुलासा झाला असून फक्त हॉटस्पॉट न दिल्याच्या रागातून कुलकर्णी यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

हडपसर भागातील घटना

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींना एनर्जी ड्रींक खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांना ॲानलाईन पेमेंट करायचे होते. ॲानलाईन पेमेंट करण्यासाठी आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट मागितले. कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट देण्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यात आरोपींनी कुलकर्णी यांच्यावर धारधार शस्रांनी वार केले, यातच त्यांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

वासुदेव कुलकर्णी खाजगी बँकेत लोन विभागात काम करत होते. ⁠मागील अनेक वर्षांपासून रात्री उशिरा सोसायटी बोहेरील फुटपाथवर शतपावली करण्याचा त्यांचा नित्यक्रम होता. घटनेच्या दिवशीही ते शतपावली करण्यासाठी बाहेर आले होते. यावेळी आरोपी आणि त्यांच्यामध्ये हॉटस्पॉटवरुन वाद झाला अन् चौघांनी त्यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. ⁠खुन झाल्यानंतर पोलीस, कुलकर्णींचे कुटुंबीय, (manager)सोसायटीतील लोक यांना कोणालाच सकाळपर्यंत या घटनेची माहीती नव्हती. पहाटे चार वाजता चार वाजता पोलीसांनी उत्कर्ष नगर सोसायटीच्या बाहेर मृतदेह पडला असल्याची माहीती मिळाली.

चप्पलवरुन ओळखले आरोपी…

त्यानंतर पोलिसांनी कुलकर्णी यांच्याच मोबाईलवरुन काही नंबरवर फोन केले आणि ओळख पटली. पुढे ही माहीती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. पोलीसांनी परीसरातील सीसीटीव्ही फुटेज शेधले. त्यात, चार आरोपी घटना स्थळाकडे जाताना आणि काही वेळाणे परत पळत जाताना दिसत होते. त्यातील एका आरोपीच्या पायात खुनाच्या आधी चप्पल दिसत होती. तर, खुनानंतर परत पळत जाताना पायात चप्पल नव्हती. त्यावरुन पोलीसांना हेच आरोपी असावेत असा संशय आला. या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचा हा संशय खरा ठरला.

हेही वाचा:

20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल

प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या

सरकार या क्षेत्राला देणार तब्बल 80,000 कोटी रुपये; देशात होणार डिजीटल क्रांती!