ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतचा पहिला व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

बॉलिवूडची ड्रामा क्वीन गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे चर्चेत आहे.(surgery) राखीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकताच राखीचं ऑपरेशन झालं आहे. राखीच्या यूट्रसमध्ये ट्यूमर होता, तो सर्जरी करून काढण्यात आला आहे. सर्जरीनंतर राखी सावंत हिचा पहिला व्हिडीओ समोर आली आहे. ज्यामध्ये राखी सावंत हिची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचं चित्र समोर दिसत आहे. राखी सावंत हिचा रुग्णालयातील व्हिडीओ अभिनेत्रीचा पहिला पती रितेश सिंह याने पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त राखी सावंत हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये राखी सावंत हिला(surgery) वेदना होत असल्याची चित्र दिसत आहे. अभिनेत्री व्यवस्थीत उभं देखील राहाता येत नाही. राखी हिला मदत करणारी एक नर्सही सोबत असते. व्हिडिओ शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये आज मी खूप आनंदी आहे… असं लिहिलं आहे.

‘राखी आता लवकरच आपल्या सर्वांमध्ये असेल. तिला चालताना पाहून मला खूप बरं वाटत आहे. चाहत्यांचे आभार…’ सध्या रितेश याने पोस्ट केलेली व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओ कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय अनेकांनी राखी हिची प्रकृती पाहून चिंता देखील व्यक्त केली आहे.

राखीच्या प्रकृतीबद्दल सांगायचं झालं तर, 15 मे रोजी राखी हिच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील तिच्यासोबत होता. रितेश गेल्या काही दिवसांपासून राखीची काळजी घेताना दिसत आहे.

राखी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आजारी आहे. ज्यामुळे चाहते देखील अभिनेत्रीसाठी प्रर्थना करत आहेत. राखी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. राखी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या राखी तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या

ट्रॉफी जिंकलीस म्हणून…; शाहरुख खानसह केकेआरच्या खेळाडूंचं सेलिब्रेशन वादात?

राहुल गांधी येताच स्टेज कोसळला; मीसा भारतींनी दिला हात…