चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याने पत्नीच्या गुप्तांगाला लावलं कुलूप

पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून(private tuition) पतीने पत्नीसोबत अघोरी कृत्य केले आहे. पतीने थेट पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले. याप्रकरणी संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग नगरी पिंपरी चिंचवड(private tuition) शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विकृत मानसिकेचा कळस गाठणारी ही घटना आहे. 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत 30 वर्षीय पतीने पत्नीसोबत अघोरी कृत्य केले आहे. पत्नीच्या गुप्तांगाला पतीने कुलूप लावले. कुलपाची चावी मिळत नसल्याने पीडित महिला गेल्या 24 तासांपासून विव्हळत आहे. या घटनेप्रकरणी संबंधित पतीविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरामध्ये आरोपी आपल्या पत्नीसोबत राहतो. मूळचा नेपाळ देशाचा रहिवासी असलेल्या आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. गुरूवारी आरोपीने पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर ब्लेडने वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबता नाही तर त्याने आपल्या पत्नीचे हात पाय ओढणीने बांधून तिच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला लोखंडी खिळयाने छिद्र पाडून त्या छिद्रात पितळी कुलूप लावल्याचे अत्यंत विकृत आणि किळसवाने कृत्य केले.

याप्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे घटनेला 24 तास उलटून गेले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलुपाची चावी नसल्याने डॉक्टरांना ते काढता येत नाही. त्यामुळे तीव्र वेदनेने पीडित महिला अजूनही विव्हळत आहे. जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबधित पतीविरोधात भादवी कलम 323, 326, आणि 504 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का! युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

हृतिक रोशनची पहिली पत्नी पुन्हा करणार लग्न? मोठी अपडेट समोर…

ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..