चंद्र आणि सुर्य आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हा राज्यातील बहिणींचा सन्मान असल्याचे (closed)वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. जोपर्यंत चंद्र आणि सुर्य आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजन बंद होणार नाही, असंही सामंत म्हणाले. ते रत्नागिरीमध्येबोलत होते. लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारी महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्यात 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

शिवसेनेचा स्ट्राईक रेट 95 टक्के आहे. सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाश शिंदे रत्नागिरीत आले असल्याचे सामंत म्हणाले. उद्योग क्षेत्रात एकनाथ शिंदे यांनी क्रांती करण्याचा निर्णय केला आहे. कोण निवडून येणार नाही यावर पैजा लागल्या होत्या, आम्हाला मात्र विजयाची खात्री होती असे सामंत म्हणाले. शरद पवार यांनी कौतुक केलं म्हणुन अनेकांच्या पोटात पोटसुळ उठला आहे असेही सामंत म्हणाले. पोटसुळ(closed) उठला त्यांना हे उत्तर, हा दुसरा टप्पा आहे, अजून एक टप्पा शिल्लक असल्याचे सामंत म्हणाले.

जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचेही सामंत म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही बहिणींचा सन्मान असल्याचे सामंत म्हणाले. चंद्र आणि सुर्य आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजन बंद होणार नाह असेही सामंत म्हणाले.
पक्ष प्रवेश केलेल्यांना ताकद देणार आहे. एकासंघ व्यासपीठ राहिलं तर कुठला माईचा लाल भेदू शकत नाही असेही सामंत म्हणाले. स्थानिक स्वराज संस्थेमध्ये तुमची ढाल बनवून तुमच्या ताब्यात देवू असेही सामंत म्हणाले.

लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं (closed)वक्तव्य केलं आहे. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

ICC ची मोठी घोषणा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला मिळणार कोटींचे बक्षीस उपविजेत्यांसाठीही मोठी रक्कम

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

हंपबॅक व्हेलने जिवंत माणसाला गिळले पण पुढच्याच क्षणी जे घडलं… Video Viral

पुरुषच नाही महिलाही दारू पिण्यात अव्वल या राज्यातील स्त्रिया सर्वाधिक पिणाऱ्या