विरोधी पक्षाला मिळणार विधानसभा उपाध्यक्षपद; देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार?
मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच विरोधीपक्ष महाविकास आघाडीने विधानसभा(politics) उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यासाठी काल काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. राज्यात विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य केल्यास विरोधकांना विधानसभा उपाधध्यक्षपद देण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी त्या पक्षाचे विधानसभेच्या(politics) एकूण सदस्य संख्येच्या किमान 10 टक्के आमदार निवडून आलेले असणे, अशी अट आहे. पण सध्या कोणत्याही विरोधी तेवढे संख्याबळ नाही. पण महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे संख्याबळ लक्षात घेता विरोधी पक्षनेतेपद महाविाकास आघाडीला देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, सत्ताधारी पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद आणि विरोधी पक्षाकडे उपाध्यक्षपद असावे. पण भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे गेल्या काही वर्षात ही परंपरा खंडित झाली होती. पण आता तू पुन्हा सुरू करावी, सरकार चालवण्यासाठी सत्ताधारी जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच विरोधकही महत्त्वाचे असतात. त्यामुळे विरोधी पक्षाला विरोधीपक्षनेते पद मिळावे, त्यासाठी संख्याबळ महत्त्वाचे नाही, अशी आमची भूमिका आहे आणि फडणवीस या दोन्ही प्रस्तांवाबाबत सकारात्मक असल्याचेही म्हटले आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ही महाराष्ट्राची विधानसभेची परंपरा आहे. दिल्ली विधानसभेत भाजपचे केवळ 3 आमदार असतानाही आम आदमी पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन एमव्हीएला विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत चर्चा केली. महायुती सरकार या प्रस्तावावर सकारात्मक विचार करेल, अशी आशा आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांचा समावेश आहे. नंतर विधानसभेत युतीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी एमव्हीएच्या नेत्यांनी बैठक घेतली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील 288 पैकी 230 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी महाविकास आघाडीला केवळ 47 जागा मिळू शकल्या.
दरम्यान, महाराष्ट्रात, विरोधी महाविकास आघाडी(politics) च्या सदस्यांसह 105 आमदारांनी रविवारी विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतली. विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांनी शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या राज्य निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी विरोधी पक्षांच्या आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.
आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही आमदारांनी शपथ घेतली. त्यानंतर आजही काही आमदार शपथ घेणार आहेत.
हेही वाचा :
“…तर रवी राणा राजीनामा देतील”; नवनीत राणांचं ओपन चॅलेंज
फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार