साक्षीचं आता काही खरं नाही! ‘परफेक्ट’ पुरावा सादर करताना अर्जुनच्या खोटेपणाला पोलिसांचीच साथ

मुंबई: ‘ ठरलं तर मग ‘च्या 18 जुलै 2025 च्या भागातही आश्रम खून प्रकरणी सुनावणी सुरू आहे.(episode) अर्जुन पुन्हा एकदा साक्षीला काही प्रश्न विचारण्यासाठी बोलावून घेतो.

अर्जुन त्याच्या हातातला पुढील पुरावा दाखवण्याआधी म्हणतो की, ‘माझ्या हातात काय आहे, हे दाखवण्याआधी मला साक्षीला एक विनंती करायची आहे. मिस साक्षी, जर तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर तुम्ही तो प्लीज कोर्टाला दाखवाल का?’ साक्षी याला मूर्खपणा म्हणते, दामिनीही याला पोरखेळ म्हणते. न्यायाधीशही साक्षीला नेकलेस (episode) दाखवण्याचे आदेश देतात. अर्जुनला भीती असते की, तिने जर तो नेकलेस घातला नसेल तर त्याची सगळी मेहनत वाया जाईल. Tharla Tar Mag च्या आधीच्या भागात अर्जुन साक्षीकडे वाराणसीचा एक बाबा बनून गेलेला असतो आणि आईचा आशीर्वाद म्हणून त्याने तिला तो नेकलेस घालण्यास सांगितले होते. अखेर अर्जुनला अपेक्षित असलेला तो नेकलेस साक्षीने घातलेला पाहून अर्जुन, सायली आणि चैतन्य यांचा जीव भांड्यात पडतो.
अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की, ‘माझ्या हातात असणारा पेंडंटचा तुकडा साक्षी शिखरे यांच्या लॉकेटचा आहे. हा तुकडा मला वात्सल्य आश्रमात मिळाला आहे.’ अर्जुन व्हिजिटिंग कार्डप्रमाणे हा पुरावाही इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे सुखरुप राहिल्याचे सांगतो. अर्जुन ते पेंडंट साक्षीच्या आईने म्हणजेच कालिंदी महाडिकने तिच्या वाढदिवशी चांदेकर ज्वेलर्समधून बनवून घेतल्याचे तो सांगतो. अर्जुनने प्रश्न विचारल्याप्रमाणे साक्षी कोर्टात सांगते की, कालिंदी तिची आई आहे.

अर्जुन असा युक्तिवाद करतो की, हा पेंडंटचा तुकडा त्याला आश्रमाच्या आतमध्ये सापडला, यावरुन हे सिद्ध (episode) होतंय की, साक्षी तिथे आतमध्ये गेली होती. दामिनीची यावरुन बोलती बंद होते. तरीही दामिनी म्हणते की, ही केस विलास मर्डरची आहे, आश्रमात कोण गेलं आणि आलं याने काहीही फरक पडत नाही. दामिनी म्हणते की, ‘मी तर म्हणते गेली असेल साक्षी आतमध्ये. तिने आधीच सांगितलं होतं की, आश्रम विकत घेण्यासाठी वडिलांसोबत ती तिथे गेली होती. त्याने काय फरक पडतो? हे सिद्ध होत नाही, विलासचा खून साक्षीने केला आहे.’

अर्जुन हा मुद्दा अधोरेखित करतो की, स्वत: दामिनी म्हणतेय की, साक्षी कदाचित त्या दिवशी आश्रमाच्या आतमध्ये गेली असेल. तो आठवण करुन देतो की, खुनाच्या रात्री साक्षी रिसॉर्टमध्ये होती, हे खोटं असल्याचं त्याने आधीच सिद्ध केलंय आणि तेव्हा तिचं फोन लोकेशन आश्रमाजवळचं आहे. तो विचारतो की, ‘जेव्हा खून झाला, तेव्हा कशावरुन साक्षी आश्रमाच्या आतमध्ये गेली नसेल? तो पेंडंटचा तुकडा, प्रितीज बुटिकचं व्हिजिटिंग कार्ड एडव्होकेट देशमुख का नाकारतायंत? जर असं असेल तर त्यांनी आता सिद्ध करावं की, या दोन्ही खुनाच्या रात्री आश्रमात पडल्या नव्हत्या.’

अर्जुनच्या या प्रश्नावर दामिनीला काहीही उत्तर देता येत नाही. अर्जुन एवढं बोलून थांबतो. न्यायाधीश असे म्हणतात की, ‘अॅडव्होकेट अर्जुन यांनी दिलेल्या पुराव्यानंतर हे सिद्ध होतंय की, साक्षी शिखरे वात्सल्य आश्रमाच्या वास्तूत गेल्या होत्या. त्या कोर्टाशी आणखी एकदा खोटं बोलल्या आहेत. त्या खुनाच्या रात्री आश्रमात गेल्या असतील, या शंकेला वाव आहे. यासंदर्भात सर्व पैलू तपासले जावेत.’

दामिनीच्या रागाचा पारा एवढा चढलेला असतो की, ती अर्जुनशी हात न मिळवता निघून जाते. त्यानंतर रविराज येऊन अर्जुनचं कौतुक करतो. रविराज असंही म्हणतो की, ‘पण तू खून साक्षीनं केल्याचं सिद्ध नाही करू शकणार, तन्वीने खून होताना प्रत्यक्ष बघितलं आहे. हा पण तू अपोझिशनची बाजू नक्कीच दुबळी केली आहेस.’ मधुभाऊही विश्वास व्यक्त करतात की, पुढच्या महिन्यापर्यंत ते नक्की सुटतील.

या सुनावणीनंतर दामिनी, महिपत आणि साक्षी यांच्यामध्ये चर्चा सुरू असते. दामिनीला संशय असतो की, अर्जुनने हे सर्व पुरावे बेकायदेशीर पद्धतीने मिळवले आहेत. इन्स्पेक्टर सावंतने अर्जुनच्या बाजूने साक्ष दिल्याने दामिनीला काहीच करता आलं नाही असं ती म्हणते. ती विचार करते की, सावंत अचानक तिथे आलेच कसे. महिपतचीही चिडचिड होते. साक्षी विचारते की, ‘सगळं संपलं आहे का?’ दामिनी तिला विश्वास देते की, असं काही होणार नाही, अर्जुनचा वाढलेला आत्मविश्वास ती संपवेल.

इन्स्पेक्टर सावंत अर्जुनचे अभिनंदन करतात. अर्जुन म्हणतो की, ‘आजची सुनावणी आपल्या बाजूने झाली असली, तरी त्याकरता तुम्हाला खोटं बोलावं लागलं की, व्हिजिटिंग कार्ड आणि पेंडंट तुम्ही बाजूला काढून ठेवलं होतं.’ चैतन्य म्हणतो की, हे अगदी छोटं खोटं आहे. तेव्हा अर्जुन त्याला गप्प करतो आणि म्हणतो की, त्याला कोर्टात खोटं बोललेलं आवडत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की, त्याने कार्ड आणि पेंडंट पोलिसांना दिलं नाही, ही बाब तांत्रिक आहे, पण त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होणार असेल, तर थोडंफार खोटं बोलायला हरकत नाही.

सायलीलाही ही गोष्ट पटत नाही. तेव्हा चैतन्य त्यांना समजावतो की, आपल्याकडे वेळ नव्हता आणि त्यामुळे दुसरा पर्यायही नव्हता. इन्स्पेक्टरही अर्जुनला समजावतो की, एखाद्याला न्याय मिळवण्यासाठी थोडंफार खोटं बोललो याचा त्रास करुन घेऊ नका.

हेही वाचा :