‘…..तर भारतीय संघाचा कर्णधार बदलावा’; सुनील गावस्कर यांच्या विधानानंतर खळबळ

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात क्लिन स्वीप मिळाल्यानंतर टीम इंडिया(Indian team) आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. असे असताना भारतीय संघाचा कर्णधार या कसोटीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आता यावरून सुनील गावस्कर यांनी तिखट प्रतिक्रिया देत असे असेल तर टीम इंडियाचा कर्णधार बदलावा असे म्हटले आहे. गावस्कर यांच्या विधानावरून चांगलेच वादंग पेटले आहे. त्यांच्या याविधानावर एरोन फिंच यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकण्याची जोरदार चर्चा आहे. या वृत्तावर टीम इंडियाचे(Indian team) माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर म्हणाले की, जर रोहित शर्मा या मालिकेत कसोटी खेळू शकला नाही तर संपूर्ण मालिकेसाठी दुसऱ्या कोणाला तरी टीम इंडियाचा कर्णधार बनवायला हवे.

गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामन्याला अनुपस्थित राहणार आहे. यावर गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली, ज्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲरॉन फिंचने असहमती दर्शवली. रोहित शर्मा लवकरच बाबा होणार आहे, रितिका सजदेह प्रेग्नेंट आहे आणि लवकरच ती एका बाळाला जन्म देईल. हे असे महत्त्वाचे कारण असताना रोहितने आपल्या कुटुंबासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. आता यावरून दोन दिग्गजांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला बोलताना गावस्कर म्हणाले, आम्ही वाचत आहोत की रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही, कदाचित तो दुसऱ्या कसोटीतही खेळणार नाही. जर हा मुद्दा असेल, तर मी म्हणेन की भारतीय निवड समितीने आता निर्णय घ्यावा, जर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती घ्या, वैयक्तिक कारणे असतील तर तुम्ही खेळाडू म्हणून या दौऱ्यावर जावे. आम्ही या दौऱ्यावर उपकर्णधाराला कर्णधार बनवू. परंतु, तुम्ही तेथे असणे गरजेचे आहे.

गावसकर पुढे म्हणाले, भारतीय संघ खूप महत्त्वाचा आहे. मी म्हणेन की जर आम्ही न्यूझीलंडची मालिका 3-0 ने जिंकली असती, तर तो वेगळा मुद्दा होता. कारण आम्ही मालिका 3-0 ने गमावली आहे, तशी गरज आहे. कर्णधारासाठी येथे संघ जोडावा लागेल, जर सुरुवातीला कर्णधार नसेल तर दुसऱ्याला कर्णधार करा.

गावस्कर यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲरॉन फिंचने ESPNcricinfo ला सांगितले की, मी याबाबत सनीच्या मताशी पूर्णपणे असहमत आहे. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. जर तुम्हाला घरीच राहण्याची गरज असेल कारण तुमची पत्नी एका मुलाला जन्म देणार आहे, हा खूप सुंदर क्षण आहे आणि तुम्ही तुमचा सर्व वेळ त्या बाबतीत घालवला पाहिजे. हा एक अनमोल क्षण आहे, जो रोहित आपल्या कुटुंबाबरोबर घालवू इच्छित आहे.

हेही वाचा :

अर्जुन तेंडुलकरला घेण्यासाठी मुंबई नाही ‘हे’ 3 संघ करणार पाण्यासारखा पैसा खर्च

सलमाननंतर आता शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी

‘लाडक्या बहिणींना 1500 नाहीतर 2100 रुपये देणार’; उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा