“…तर रवी राणा राजीनामा देतील”; नवनीत राणांचं ओपन चॅलेंज

नुकत्याच झालेल्या विधानसभा(political circle) निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झालाय. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही मतदानात गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात येत आहे. अशात अमरावतीत सध्या राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने आंदोलन पुकारले आहे. यावरच भाजपच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी मविआ नेत्यांना आव्हान दिलं आहे.

मविआ नेत्यानी लोकसभा(political circle) निवडणुकीच्‍या निकालानंतर मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला नाही. मात्र आता ते उगाच आरोप करीत सुटले आहेत. त्‍यांना जर इव्‍हीएमवर शंका असेल, तर अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मविआला दिलं आहे.

लोकसभेत यांना यश मिळालं तेव्हा त्यांनी इव्‍हीएमवर शंका उपस्थित केली नाही. त्‍यावेळी इव्‍हीएम बरोबर होते. तेव्‍हा लोकशाही जिवंत होती, असा टोला देखील नवनीत राणा यांनी लगावला. सध्या नवनीत राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना दिलेल्या आव्हानाची चर्चा सुरू आहे.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी राजीनामा द्या, मग रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, असं नवनीत राणा म्हणाल्या. त्यांचे हे आव्हान खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलं असून त्यांनी प्रतिआव्हानही दिलं आहे.

“भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या नवनीत राणा यांनी आव्हान दिलं आहे की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेटपेपरवर निवडणूक लढवाव्यात. निवडणूक आयोगाकडून त्यांनी मला लेखी पत्र द्यावं. येणारी लोकसभेची पोटनिवडणूक बॅलेटपेपरवर होईल, असं या लेखी पत्रात असावं. मी कधीही राजीनामा देण्यास तयार आहे. फक्त एकच अट आहे की निवडणूक आयोगाकडू बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊ असं पत्र त्यांनी द्यावं.”, असं प्रतिआव्हान बळवंत वानखेडे यांनी दिलं आहे. आता नवनीत राणा हे आव्हान स्वीकारणार का?, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा :

फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य