‘या’ मोठ्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, लवकरच प्रियंका चोप्रासोबत दिसणार ब्लॉकबस्टर चित्रपटात!

डब्लूडब्लूई सुपरस्टार आणि हॉलीवूड अभिनेता जॉन सीना याने एक मोठा निर्णय घेत आपले लाखो-कोट्यवधी चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 2025 हे वर्ष त्याचं डब्लूडब्लूई मधलं शेवटचं वर्ष ठरणार असून, त्यानंतर तो रेसलिंगपासून संन्यास घेणार आहे. या निवृत्तीनंतर(retirement) नव्या क्षेत्रात एन्ट्री घेणार आहे. जॉन सीन लवकरच मनोरंजन क्षेत्रात आपलं पाऊल ठेवू सुरुवातीलाच तो बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत एका मोठ्या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे.

एका मुलाखतीत जॉन सीना म्हणाला, “माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी पत्नी, शाय शरियात्जादेह ही आहे. तिच्यासाठी मी माझं आरोग्य सांभाळणं आणि तिच्यासोबत उत्तम जीवन जगणं हीच आता माझी प्रॉयोरिटी आहे.” डब्लूडब्लूई मध्ये दोन दशकांहून अधिक काळ वर्चस्व गाजवणाऱ्या सीना साठी हा निर्णय नक्कीच सोपा नव्हता, पण आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देत आहे.

सीना पुढे म्हणाला, “2025 मध्ये मी रेसलिंगमधून निवृत्ती(retirement) घेणार आहे. मी माझा इन-रिंग करिअर सन्मानाने संपवू इच्छितो. मात्र WWE सोबतचं नातं मी कधीच तोडणार नाही. मी कायमच या संस्थेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून जोडलेलो राहीन.”

रेसलिंग व्यतिरिक्त जॉन सीना हा हॉलीवूडमधील देखील एक मोठं नाव आहे. 2 जुलै रोजी त्याचा ‘Heads of State’ हा बहुचर्चित चित्रपट Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. या चित्रपटात तो प्रियंका चोप्रा जोनस आणि इदरीस एल्बा यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. इल्या नैशुलर दिग्दर्शित या सिनेमात पॅडी कंसिडाइन, स्टीफन रूट, कार्ला गुगिनो, जॅक क्वेड आणि सारा नाइल्स हे कलाकारही झळकणार आहेत. ही फिल्म रिंगबाहेरील सीना चाहत्यांसाठी एक वेगळी मेजवानी ठरणार आहे.

हेही वाचा :