पार्टी आणि मजा करणाऱ्यांसाठी सध्या एक नवा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘जेब्रा स्ट्रायपिंग’ नाव थोडंसं वेगळं वाटत असलं, तरी यामागचा उद्देश मात्र अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. दावा असा आहे की या पद्धतीने दारू(drink) प्यायल्यास हँगओवरपासून (म्हणजे डोकेदुखी, थकवा, तहान, उलट्या यासारख्या त्रासांपासून) सुटका होऊ शकते.

जेब्रा स्ट्रायपिंग म्हणजे दारू पिताना एक विशिष्ट पद्धतीचा अवलंब करणं. यात एकदा दारू घेतल्यानंतर लगेच एक नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक जसं की पाणी, लिंबूपाणी किंवा सोडा घेतलं जातं. पुन्हा एकदा दारू आणि पुन्हा एक सॉफ्ट ड्रिंक अशी ही मालिका चालू राहते. यामागे कल्पना ही आहे की शरीर हायड्रेटेड राहतं, त्यामुळे नशा हळूहळू होते आणि शरीर त्याला सहजपणे सामोरं जाऊ शकतं. हे अगदी जेब्रा प्राण्याच्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांसारखं एक दारू, एक सॉफ्ट ड्रिंक(drink) असा नमुना आहे.
हा ट्रेंड प्रामुख्याने Gen Z आणि मिलेनियल्स पिढीमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. कारण ही पद्धत ‘स्मार्ट ड्रिंकिंग’ म्हणून पाहिली जाते. मात्र तज्ज्ञांच्या मते, ही पद्धत हँगओवर पूर्णतः टाळू शकते, असं नाही. पण शरीरातलं पाणी कमी होण्याचा धोका कमी करते, जे हँगओवरचं मुख्य कारण असतं.

जर कोणी हा ट्रेंड वापरायचा विचार करत असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उपाशी पोटी कधीही दारू पिऊ नये, दर वेळेस पाण्याचं सेवन करावं, स्वतःची मर्यादा ओळखून दारू प्यावी आणि झोप पूर्ण घ्यावी. शेवटी, कोणताही ट्रेंड फॉलो करताना आपलं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त ट्रेंड म्हणून नाही, तर जबाबदारीने विचार करूनच निर्णय घ्या.
जेब्रा स्ट्रायपिंग उपयुक्त आहे की नाही, हे ठरवणं तुमच्यावरच आहे. पण स्मार्ट ड्रिंकिंग नेहमीच फायद्याचं ठरू शकतं. मुळात, मद्यपान करणेच चुकीचे आहे. मद्यपानाने अनेक समस्या निर्माण होतात, ज्या आरोग्यसाठी आणि आपल्या सामाजिक जीवनासाठीही अयोग्य आहे.
हेही वाचा :
भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचं बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचे प्रेमसंबंध म्हणाले, मी तिच्यासोबत
राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; १५ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट