तुमच्या शरीरावरील ‘हे’ तीळ सांगतात, तुमचे लग्न लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज!

सामुद्रिक शास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तीळांच्या आकार आणि स्थानाच्या आधारावर व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगतो(marriage). सामुद्रिक शास्त्राच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचीही माहिती घेता येते.

आपल्या शरीरावरील तीळ हे देखील सूचित करतात की कोणाचे लग्न(marriage) लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज. या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया महिलांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेले तीळ त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगतात.
नाकावरील तीळ : नाकावर तीळ असणे स्त्रीच्या नशिबात प्रेमविवाहाची शक्यता दर्शवते. नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर ते अधिक शुभ असते. अशा महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण प्रेम आणि पाठिंबा मिळतो. हा तीळ त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुख आणि समाधानाचे प्रतीक मानला जातो.
उजव्या डोळ्यावरील तीळ: स्त्रियांच्या उजव्या डोळ्यावर असणारा तीळ सूचित करतो की त्यांचा स्वभाव आकर्षक आहे आणि त्या पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करू शकतात. या ठिकाणी तीळ असल्यास प्रेमविवाह होण्याची शक्यता वाढते. या प्रकारच्या स्त्रिया त्यांच्या आवडीनुसार जीवनसाथी निवडतात आणि त्यांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी मिळतो.

कानावर तीळ : स्त्रीच्या कानावर तीळ असणे म्हणजे ती तिच्या प्रेमसंबंधांना गांभीर्याने घेते. अशा स्त्रिया त्यांच्या जोडीदारांप्रती अत्यंत निष्ठावान असतात आणि त्यांच्या प्रेमाला सामाजिक मान्यता देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने लग्न करणे पसंत करतात.
सामुद्रिक शास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे जे शरीरावरील तीळ, रेषा आणि इतर चिन्हांच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि भविष्य याबद्दल भाकीत करते. या शास्त्राचा उपयोग करून आपण आपल्या जीवनातील अनेक रहस्ये उलगडू शकतो.
हेही वाचा :
IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत
करदात्यांना मिळणार दिलासा; इतक्या लाखांचं उत्पन्न करमुक्त होणार?
चिकन खात असाल तर आत्ताच व्हा सावध; ‘बर्ड फ्लू’ ने टेंशन वाढवलं