या महिन्यात सोन्यासह चांदीने पण सोडला दरवाढीचा हट्ट.

ग्राहकांना सोने-चांदीच्या (silver price)आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही किंमतीत मोठा बदल झाला नाही. ग्राहकांना खरेदीची मोठी संधी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात मौल्यवान धातूत वाढ झाली होती. या तीन दिवसांत सोने आणि चांदीत चढउतार दिसला. पण किंमतीत मोठा बदल झाला नाही. काय आहे बेशकिंमती धातूंचा भाव.

सोन्यात घसरणीचे सत्र

या आठवड्याच्या सुरुवातीला 17 जून रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. 18 जून रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाले. 19 तारखेला किंमतीत काही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी घसरली

या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 15 जून रोजी 500 रुपयांनी भाव वधारले. पुढील दोन दिवस भावात बदल दिसला नाही. 18 जून रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. तर दुसऱ्या दिवशी 19 जून रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत दरवाढ झाली. 24 कॅरेट सोने 71,704 रुपये, 23 कॅरेट 71,417 रुपये, 22 कॅरेट सोने 65,681 रुपये झाले. 18 कॅरेट 53,778 रुपये, 14 कॅरेट सोने 41,947 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,195 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

हेही वाचा :

‘धनुष्यबाण’ न वापरता निवडणूक लढवून दाखवा, उद्धव ठाकरे

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दागिन्यांची मोजदाद सुरू..

छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? ठाकरे गट मोदींकडे जाणार?