उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का! युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एकीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच पुण्यात शिवसेना(current political news) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहित सामूहिक राजीनामे दिले आहेत. ऐन लोकसभेच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी(current political news) समोर समोर आली आहे. पुण्यामधील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेवर नाराजी व्यक्त करत सामुहिक राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशाची मागणी या गोष्टींना वैतागून अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले .पण पदाधिकाऱ्यांकडून घाणेरडी वागणूक मिळाल्याचा आरोप या राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच पक्षांतर्गत गटबाजी, शिवसेना पक्ष आणि मतभेद हे कायम पाहायला मिळते. मात्र पदासाठी पैशांची मागणी केली जात आहे, असा गंभीर आरोपही या पत्रामध्ये करण्यात आला आहे. हे सर्व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटामध्येही अंतर्गत वाद उफाळून आला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून विचारात घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांही राजीनामा अस्त्र उचलले होते. त्यानंतर आता ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा :

RCB विरोधातील सामन्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार?

ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..

हृतिक रोशनची पहिली पत्नी पुन्हा करणार लग्न? मोठी अपडेट समोर…