वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस मुलीला जन्म

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि पत्नी नताशा दलाल यांना(baby) कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. सोमवारी दुपारी नताशा दलाल हिला प्रसुती कळा सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा वरुण धवन याचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली.

वरुण धवनने 4 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर एक(baby) सुंदर फोटो शेअर केला होता. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये वरुण धवन त्याच्या पत्नीच्या बेबी बंपला किस करताना दिसत होता. लवकरच आम्ही पालक होणार असल्याची माहिती त्याने दिली. नताशाला 3 जून रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण धवन कुटुंब हिंदुजा हॉस्पिटलबाहेर दिसले.

लग्नाच्या 3 वर्षानंतर वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी एका चिमुकल्या परीचे स्वागत केले आहे. दोघांनी 24 जानेवारी 2021 रोजी अलिबागमध्ये लग्न केले. नताशा आणि वरुण धवन हे शाळेपासूनचे मित्र होते. बऱ्याच कालावधीनंतर दिवसांनी दोघांनी मैत्रीचे नातं पुढे नेले आणि प्रेमाच्या नात्यात अडकले. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही 2021 मध्ये विवाहबद्ध झाले.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल जानेवारी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. नताशा आणि वरुण लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांचं एकत्र शिक्षण झालं आहे. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. वरुणने लग्नासाठी नताशाला अनेकदा विचारलं. पण कायमच ती नकार देत होती. अखेर नताशाने होकार दिला. पुढे 24 जानेवारी 2021 रोजी ते लग्नबंधनात अडकले. आता लग्नाच्या तीन वर्षांनी वरुण धवन बाबा होणार आहे. वरुण धवनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिश्मा