भाज्यांचे दर स्वस्त, गृहिणींना दिलासा….

मागील काही दिवसांपासून बाजारात भाज्यांचे दर वाढलेले पाहायला मिळतात. (vegetable)अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाज्यांचे जर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात १५ रुपये दराने मिळणारी मेथीची गड्डी सध्या ७ रुपये दराने मिळत आहे. फुलकोबी आधी ६० ते ७० रुपये किलो होती. तिचे भाव ५० रुपये किलोवर आले आहेत. पत्ताकोबी ५० ते ६० रुपये किलो होती. आता पत्ताकोबीचा दर कमी होऊन ४० रुपये एवढा झाला आहे.

मात्र बाजारात शेवगा आणि लसणाचे भाव चढेच आहेत. पंधरा दिवसांपूर्वी शिमला मिरची १०० रुपये किलो होती. आता ६० रुपये किलोन एवढा दराने मिळत आहे. वांग्याचे दर गेल्या (vegetable)आठवड्यात ६० रुपये किलो होते. ते ४० रुपये किलोवर आले. लिंबू ७० ते ८० रुपये किलोपर्यंत होते. सध्या ४० ते ५० रुपयांत एक किलो लिंबू मिळत आहेत. शेवगा ६० रुपये किलो होते. आता ४० रुपये एवढा भाव आहे. दोन दिवसांआधी वाटाण्याच्या शेंगा १०० रुपये किलो होत्या. आता ७० ते ८० रुपये किलो आहेत.

मागील काही महिन्यांत भाज्यांचे दर वढारलेले पाहायला मिळत होते. भाज्यांच्या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत होती. मात्र सध्या छत्रपती जिल्ह्यात भाज्याचे (vegetable)दर कमी झालेले आहेत. भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना थंडीत वेगवेगळ्या भाज्यांचा आस्वाद घेता येणार आहे. भाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणी देखील सुखावणार आहेत.   

हेही वाचा :

आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!

MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा