या जिल्हामध्ये भाज्यांचे दर घटले..

छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांची (vegetable)आवक झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना भाज्यांचे दर कमी होण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः पालेभाज्यांचे दर “गारठल्याने,” किरकोळ बाजारातील दर खरेदीदारांसाठी खूपच अनुकूल झाले आहेत.जाधववाडी बाजार समितीत मेथी, पालक, शेपू, कोथिंबिरी यांसारख्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे यांचे दर लक्षणीय घटले आहेत. आठवड्यापूर्वी १० रुपयांना एक गड्डी मिळणाऱ्या पालेभाज्या आता १० रुपयांत तीन गड्या मिळत आहेत. मात्र, या दरकपातीने शेतकऱ्यांचे काहीसे नुकसान होत असले तरी ग्राहकांसाठी ही स्थिती फायदेशीर ठरत आहे.


पालेभाज्यांच्या तुलनेत शेवग्याच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. किरकोळ बाजारात शेवगा ३५० ते ४०० रुपये प्रति किलो या उच्च दराने विकला जात आहे. यंदा बाजारात चार क्विंटल(vegetable) शेवग्याची आवक झाली आहे, परंतु मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे दर टिकून आहे.

इतर भाज्यांच्या दरातही घट
    •    लसूण: मागील आठवड्याच्या तुलनेत ४० ते ५० रुपयांनी दर कमी झाले असून, चांगल्या प्रतीच्या लसणाला आता ३०० ते ५०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
    •    आद्रक: दर ४० रुपयांवरून ३० ते ३५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत.
    •    शिमला मिरची: सध्याचा दर २५ ते ३० रुपये प्रति किलो आहे.
    •    पत्ता कोबी व फुलकोबी: या भाज्या ३० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत.
    •    लिंबू: ३० ते ३५ रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे, जो मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे.

दर कमी झाल्यामुळे ग्राहक आनंदित असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हे आर्थिक आव्हान बनले आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा झाल्यामुळे मागणी-पुरवठ्याच्या संतुलनात बिघाड झाला आहे, ज्याचा परिणाम बाजारातील दरांवर झाला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील भाज्यांचे दर कमी झाल्याने स्थानिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेवग्यासारख्या काही भाज्यांचे दर अजूनही स्थिर असल्याने(vegetable) त्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अपेक्षित सवलत मिळालेली नाही. 

चालू भाव (किलोमध्ये)

भाज्या -दर
वालाच्या शेंगा-२० रुपये,
डिंगऱ्या-२० ते २५ रुपये,
डांगर-३० ते ३५ रुपये
कारले=३५ ते ४० रुपये
चायना काकडी=२० रुपये
गावरान काकडी=३० रुपये
हिरवी मिरची=२५ ते ३० किलो
खिरे=२० ते ३० रुपये
टोमॅटो = २० ते ३० रुपये

हेही वाचा :

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार

एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य