बंगळुरूमध्ये एका धावत्या बसमध्ये घडलेला संतापजनक (misbehavior)प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा आधार मानल्या जाणाऱ्या बसमध्ये एका कंडक्टरने महिला प्रवाशाशी केलेल्या गैरवर्तनाचा प्रकार समोर आला असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळुरूमधील एका मुख्य मार्गावर धावत असलेल्या बसमध्ये घडली आहे. ही घटना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये कंटक्टरने झोपेत असलेल्या महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करताना स्पष्टरित्या दिसत आहे. त्याच वेळी दुसऱ्या प्रवाशाने सर्व प्रकार चित्रित केला आहे.

घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील fem.social या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर घडलेल्या घटनेचे सविस्तर कारण दिलेले आहेत. (misbehavior)एका दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर होताच लाखो लोकांनी पाहिला असून फेसबूक, ट्वीटर आणि अन्य माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे.
हे प्रकरण व्हायरल होताच पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली असता या कंटक्टरवर एफआयआर दाखल करण्यात आली असून १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (misbehavior)मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. त्यातील काहींनी कमेंटमध्ये, चांगलीच अद्दल घडवा”असे म्हटलं आहे तर काहींनी,”सुटका झालीच नाही पाहिजे असं करा” अशा अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
हेही वाचा :
मोठा घोटाळा ! कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार
बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…
देशात होणार जातनिहाय जनगणना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचा मोठा निर्णय