विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरनसने आरसीबीची रन मशिन विराट कोहलीच्या(virat kohli) भविष्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे एका वगेळच्या चर्चेला ऊत आला आहे. केविन पिटरसनने विराट कोहलीला जर आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर आयपीएलचा संघ बदलायला हवा असा सल्ला दिला आहे.

विराट कोहलीसाठी(virat kohli) आयपीएल 2024 हा अजून एक हंगाम असा होता जिथं त्यानं खोऱ्यानं धावा केल्या. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र तरी देखील आरसीबीला यंदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. राजस्थानने त्यांचा एलिमिनेटर सामन्यात 4 विकेट्सनी पराभव केला.

यानंतर विराट कोहलीचे आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याची इच्छा कधी पूर्ण होणार का अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली. त्यात इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने देखील उडी घेतली असून तो स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, ‘मी या आधी देखील हे बोललो आहे. मी पुन्हा तेच सांगतो. दुसऱ्या गेममधील इतर महान खेळाडूंनी विजेतेपद पटकावण्यासाठी एक संघ सोडून दुसऱ्या संघात उडी घेतली आहे.’

‘विराट कोहलीने खूप प्रयत्न केले. पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकली. खूप काही केलं तरी देखील फ्रेंचायजी अपयशी ठरली. टीमचा ब्रँड आणि विराटने संघात आणलेल्या व्यावसायिक मुल्याची जाणीव मला आहे. विराट कोहली एका ट्रॉफीचा नक्कीच हकदार आहे. त्याला अशा संघाकडून खेळलं पाहिजे जो संघ त्याला ट्रॉफी जिंकून देण्यास मदत करेल.’

विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. तो हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 15 सामन्यात 741 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट हे 155.81 इतके होते. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने 5 अर्धशतके आणि 1 शतकी खेळी केली.

हेही वाचा :

एकच आश्वासन देत दोन्ही पत्नींना पटवलं, YouTuber Armaan Malikची पोलखोल

शरद पवारांना मतदानानंतर 16 दिवसांनी विजयाची चाहुल लागली?

शरद मोहोळ खूनप्रकरण;पोलिसांनी सादर केले दोन हजार पानांचे दोषारोपपत्र