लग्न ही मजबुरी होती?; नताशा-हार्दिकच्या नात्यातील नवा ट्विस्ट काय?

प्रसिद्ध ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आला आहे. हार्दिकच्या वैवाहिक(relationship therapist) जीवनात मोठं वादळ आलं आहे. त्याचा पत्नीसोबत घटस्फोट होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. संपूर्ण सोशल मीडियात हार्दिकच्या वैवाहिक जीवनावर चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अशा काही घटना घडत आहेत की हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे. मात्र, या मुद्द्यावर ना हार्दिकने भाष्य केलंय, ना त्याच्या बायकोने. त्यामुळे हार्दिक आणि नताशा दोघं खरोखरच वेगळे होणार का? असा सवाल केला जात आहे.

हार्दिक आणि नताशा यांच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने या दोघांच्या नात्यावर(relationship therapist) भाष्य केलं आहे. या व्यक्तीच्या दाव्यानुसार नताशा आणि हार्दिकच्या संसारात गेल्या सहा महिन्यापासून खटके उडत आहेत. जेव्हा नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पांड्या हे आडनाव हटवल्यानंतर या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याचं आणि प्रकरण अत्यंत टोकाला गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या दोघांच्या नातेसंबंधावर भाष्य करत गेल्याने ही चर्चा अधिकच वाढत गेली.

सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यावर वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात आहे. कोणी काय बोलत आहे, तर कोणी काय? असा सर्व खेळ सुरू आहे. गंमत म्हणजे सोशल मीडियात घटस्फोटाच्या अफवांची एवढी चर्चा सुरू असतानाही हार्दिक आणि नाताशाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. शिवाय या चर्चा सुरू झाल्यापासून हे दोघे एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. या दोघांचा घटस्फोट होणार आहे का? झाला तर कधी होईल? दोघे घटस्फोट का घेत आहेत? काय घडलंय या दोघांमध्ये? कारणं काय आहेत? याचीच चर्चा आता रंगताना दिसत आहे.

दरम्यान, हार्दिक आणि नताशा यांचा विवाह 31 मे 2020मध्ये झाला होता. या दोघांची पहिली भेट 2018मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. तिथेच दोघांचं सूत जमलं. हार्दिकने त्याच्या वाढदिवसाला नताशाला बोलावलं होतं. दोन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं. नताशा लग्नाच्या आधीच प्रेग्नंट झाली होती. त्यामुळे दोघांनी लगेच लग्नाचा निर्णय घेतला होता. हार्दिकला मजबुरीने लग्नाचा निर्णय घ्यावा लागला होता असं सांगितलं जातंय. लग्नानंतर दोन महिन्याने म्हणजे जुलै 2020मध्ये त्यांना मूल झालं.

आता चार वर्षानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्यात बिनसल्यानेच ही चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएलचा संपूर्ण सीजन संपला, पण नताशा एकदाही हा सामना पाहायला आली नाही. सामन्या दरम्यान गॅलरीत हार्दिक सोबत दिसली नाही. त्यामुळेही या अफवा सुरू झाल्या आहेत. त्यातच नताशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यात तिने जीजसशी संवाद साधला होता. मी एकटीच नसून माझ्यासोबत जीजस असल्याचं तिला सूचवायचं होतं.

हेही वाचा :

शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद

हनीमून पॅकेजच्या नावाखाली फ्लॅटमध्ये सुरु हाेतं भलतंच