गर्ल्स हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् विनाकारण मार खाऊन आला; मजनूचा Video Viral

हॉस्टेल लाइफ कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय टप्पा असतो. त्या काळात आपण बनवलेल्या आठवणी, आपण बनवलेले मित्र या गोष्टी माणसाच्या आयुष्यात नेहमीच जपल्या जातात. एकमेकांच्या खोड्या काढण्यापासून ते हॉस्टेलच्या बाहेर डोकावण्यापर्यंत किंवा रात्री उशिरा लपून छपून स्नॅक्स बनवण्यापर्यंत, प्रत्येक हॉस्टेलच्या(girls hostel) स्वतःच्या अशा अनोख्या आठवणी असतात. सध्या हॉस्टेलसंबंधीचीच एक अनोखी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील हा डायलॉग तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र हा डायलॉग एका तरुणाने जरा जास्तीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. आजकाल तरुण पिढी आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत नाही. आपल्या प्रेमासाठी ते वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मुलीच्या वेशात गर्ल्स हॉस्टेलमध्ये(girls hostel) घुसला. मात्र त्याचा हा पराक्रम त्याला फार महागात पडला. पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

तरुणांमध्ये लैला-मजनू ही जोडी फार फेमस आहे. प्रेमाचे उदाहरण म्हणून या ऐतिहासिक जोडीकडे पाहिले जाते. आजकाल अनेक युवक-युवती या जोडीचे आदर्श घेत आपल्याला लैला-मजनू समजू लागतात. तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये नायकाला खिडकीतून अथवा कुंपण तोडून नायिकेला भेटताना पाहिले असेल. मात्र हा फिल्मी प्रकार सत्यात करू पाहणाऱ्या तरुणासोबत एक वेगळीच घटना घडून आली.

आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तरुण मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेला खरा मात्र यावेळी नशिबाने त्याने फजिती केली आणि तो हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांद्वारे पकडला गेला. पकडल्यांनंतर या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओत तुम्हाला तरुणाला मारत मारत हॉस्टेलमधून बाहेर काढल्याचे दिसून येईल. दरम्यान हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर क्रतू आहेत.

दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कॉलेजचे अधिकारी आणि एक मुलगा यांच्यात हाणामारी झाली, हा मुलगा मुलीच्या वेशात मुलींच्या वसतिगृहात घुसला आणि पकडला गेला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्या मुली एवढ्या आनंदी का आहेत..?” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “अशी लज्जास्पद कृत्ये करून त्यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे”.

हेही वाचा :

प्रजासत्ताक दिनानिमित्त Google चं खास डूडल

अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम

काळीज पिळवटून टाकणारी घटना; रागाच्या भरात आईने 9 महिन्याच्या बाळाला छतावरून फेकलं