मोदींना एवढी कसली भीती? मंत्रिपदाबाबत खासदारांना केलं अलर्ट

एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व (party supplies)खासदारांना मंत्रिपदाबाबत सतर्क केले आहे.एनडीए’च्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करण्यात आली. ते रविवारी (ता. 8) पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या खासदारांना संधी मिळणार, याबाबत आता चर्चा झडू लागल्या आहेत. पण मोदींनी शुक्रवारीच सर्व खासदारांना अलर्ट केले.

मंत्रिपदाच्या रेसमध्ये अनेकांची नावे समोर येऊ लागली आहेत. त्यातच भाजपला स्बळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्याने इंडिया आघाडीकडून एनडीएतील घटक पक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा बातम्या सातत्याने येत आहेत. ही चिंता मोदींनी एनडीएच्या बैठकीतच बोलून दाखवली.

खासदारंना अलर्ट करताना मोदी म्हणाले, कुणाच्या सांगण्यावरून(party supplies) वाहत जाऊ नका. तुम्ही मंत्री होणार आहात, असे कुणीतरी तुम्हाला फोन करून सांगेल. त्यावर विश्वास ठेऊ नका. तुम्हाला फोन करणारा कोण आहे, याची खात्री करा. मंत्री कुणाला बनवायचे, हे माझी अनुभवी टीम ठरवेल.

आजकाल कुणाच्याही नावावर काहीही खपवले जात असल्याचे सांगत मोदींनी विरोधकांवरही निशाणा साधला. मागील दहा वर्षा अशी संधी न मिळाल्याने यावेळी उकळ्या जास्त फुटत आहेत. तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की माझी सही असलेली मंत्र्यांच्या नावाची लिस्टही बाहेर येईल. कुणीतरी माझ्या नावाने खातेवाटपही करेल, असे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही यामध्ये फसू नका, असा सल्ला मोदींनी दिला.

अनेक लोक सरकार बनवू पाहत आहेत. (party supplies)ही लोकं मंत्रिपदं वाटत आहेत. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. हे सगळे प्रयत्न बेकार आहेत, अशी टीका मोदींनी इंडिया आघाडीवर केली. ते या निवडणुकीत खोट्या बातम्या पसरवण्यात तज्ज्ञ झाले आहेत. मंत्रिपदांबाबत ते चुकीची माहिती पसरवत आहेत. अशा अफवांपासून दूर राहा. मंत्रिपदांबाबत आपली टीम निर्णय घेईल, असे मोदींनी स्पष्ट केले.   

हेही वाचा :

आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’

 राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर

विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा