व्हॉट्सअपचा आलाय ‘मल्टि लॉगिन’ ऑप्शन…

व्हाट्सअपने नुकतीच एक धमाकेदार घोषणा केली आहे.(whatsapp b) आता तुम्ही तुमचे व्हाट्सअप अकाऊंट एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकता. त्यामुळे तुमचा फोन बंद असला तरी तुमचा डेटा आणि तुमच्या चॅट सुरक्षित राहतील.

कोणत्या डिव्हाइसवर व्हाट्सअप चालू करता येईल?

  • डेस्कटॉप
  • स्मार्टवॉच
  • व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट
  • टॅब्लेट

Android वापरणारे यूजर्स:
तुमच्या मुख्य फोनवर व्हाट्सअप उघडा(whatsapp b)आणि सेटिंग्जमध्ये जा.

“लिंक्ड डिवाइसेस” वर टॅप करा आणि “लिंक डिवाइस” निवडा.

तुम्हाला लिंक करायचा असलेला डिव्हाइस तुमच्या मुख्य फोनच्या समोर ठेवा आणि दाखवलेला QR कोड स्कॅन करा.

iPhone वापरणारे यूजर्स:
Android वापरणार्‍यांसाठी दिलेल्या सूचनेप्रमाणेच “लिंक अ डिवाइस” वर जा.

तुमचा iPhone लिंक करायचा असलेल्या डिव्हाइसच्या समोर ठेवा आणि QR कोड स्कॅन करा. ही प्रोसेस एवढी सोपी आहे.

डेस्कटॉप WhatsApp:
-तुमच्या मुख्य फोनवर (Android किंवा iOS) व्हाट्सअप उघडा.

-सेटिंग्जमध्ये जा आणि “लिंक्ड डिवाइसेस” निवडा.

-तुमच्या डेस्कटॉपवर, ब्राउझरवर WhatsApp वेब पेज (www.whatsapp.com) उघडा.

-एक नवीन विंडो QR कोडसह उघडेल. तो कोड तुमच्या मुख्य फोनने स्कॅन करा.

-डिव्हाइस सिंक होण्याची वाट पहा. तुमच्या चॅट डेस्कटॉपवर दिसतील.

WearOS स्मार्टवॉचसाठी व्हाट्सअप:
-तुमच्या Wear OS स्मार्टवॉचवर व्हाट्सअप उघडा.

स्क्रीनवर आठ-अंकी कोड दिसेल.

-सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जाण्यासाठी क्लिक करा.

-तुमचे मुख्य व्हाट्सअप डिव्हाइस घ्या आणि स्मार्टवॉचवर दिसलेला आठ-अंकी कोड एंटर करा.

Apple वॉचसाठी व्हाट्सअप:

-सध्या Apple वॉचवर फक्त व्हाट्सअप नोटिफिकेशन वाचता येतात, मेसेजला उत्तर देता येतात आणि मेसेज पाठवता येतात / प्राप्त करता येतात.

हेही वाचा :

Google Meet मध्ये आलय ‘हे’ नवीन एआय फिचर

काय सांगता! हमीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज

राधिका आणि अनंत अंबानींचा विवाह लंडनला होणार नाही?, कुठे होणार?