देशात पहिलं आधार कार्ड कुणाला मिळालं? उत्तर ऐकून थक्क व्हाल!

आधार कार्ड हे आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे.(Aadhaar card)बँकेत खातं उघडणं, सिम कार्ड घेणं किंवा सरकारी योजनेचा लाभ घेणं असो, सर्वत्र आधार कार्डची गरज भासते. पण अभिमानाची गोष्ट अशी की, भारतातलं पहिलं आधार कार्ड आपल्या महाराष्ट्रातील एका महिलेच्या नावावर नोंदवलं गेलं होतं.नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या लहान गावात राहणाऱ्या रंजना सोनवणे यांना २९ सप्टेंबर २०१० रोजी भारतातलं पहिलं आधार कार्ड देण्यात आलं. हा ऐतिहासिक क्षण फक्त त्यांच्या दृष्टीनेच नाही, तर महाराष्ट्रासाठीही अभिमानाचा विषय ठरला. आज या कार्डाचा वापर देशभरातील कोट्यवधी लोक करीत आहेत.त्यामुळेच प्रत्येक नागरिकासाठी आपलं आधार कार्ड वेळोवेळी अपडेट ठेवणं आवश्यक ठरतं.

‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
UIDAI भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ने नुकतीच सूचना दिली आहे की, जर एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड काढून १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल आणि या दरम्यान त्यात कोणतंही अपडेट केलं नसेल, (Aadhaar card)तर त्यांनी लवकरात लवकर ते अपडेट करणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात काही सेवांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात.

अपडेट करणं अगदी सोपं
आधार कार्ड अपडेट करणं अगदी सोपं आहे. तुम्ही UIDAI च्या ‘MyAadhaar’ पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता. यासाठी फक्त ₹५० शुल्क आकारलं जातं. मोबाईल नंबर, ईमेल, फोटो किंवा बायोमेट्रिक्स अपडेट करायचे असल्यास, जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागतं, जिथे साधारणपणे ₹५० ते ₹१०० शुल्क आकारलं जातं.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला SRN मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही अर्जाचं स्टेटस ट्रॅक करू शकता. साधारणपणे काही दिवसांपासून ते ३० दिवसांत आधार अपडेट होतं (Aadhaar card)आणि त्यानंतर तुम्ही नवीन कार्ड डाउनलोड करू शकता किंवा पोस्टाने घरी मागवू शकता. त्यामुळे जर तुमचं आधार अपडेट नसेल, तर आजच ही प्रक्रिया पूर्ण करा!

हेही वाचा :

पंतप्रधान नट-नट्यांसोबत व्यस्थ अन्…; खासदार संजय राऊतांचा घणाघात

4 संकेतावरुन ओळखा जोडीदाराचं तुमच्यासोबतचं नातं मनातून तुटलंय

…अन् मॅचनंतर त्याने थेट पॉन्टिंगच्या बायकोलाच मारली मिठी! भारतीय क्रिकेटरचा Video चर्चेत