घटस्फोटित मुनव्वर फारुकीची कोण आहे दुसरी पत्नी
‘बिग बॉस १७’ विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या त्याच्या खासगी(divorced) लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने १०-१२ दिवसांपूर्वी गुपचूप निकाह केला आहे. मुनव्वरच्या दुसऱ्या निकाहला नातेवाईक आणि मित्र असे मोजकेच लोक उपस्थित होते. मुनव्वरने मेहजबीन कोटवाला नावाच्या मुलीसोबत निकाह केलेला आहे. मुनव्वरची होणारी दुसरी बायको कोण आहे ? जाणून घेऊया…
मेहजबीन कोटवाला ही यापूर्वी इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह नव्हती. निकाह(divorced) केल्यानंतर ती सोशल मीडियावर सक्रिय झालेली आहे. तिने इन्स्टाग्रामवर डेब्यू केलेलं आहे. मुनव्वरच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर आणि मेहजबीनने २६ मे रोजी मुंबईतल्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये रिसेप्शन केले आहे. मेहजबीन कोतवाला पेशाने मेकअप आर्टिस्ट आहे. मुनव्वरने लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. कारण त्याला त्याचे दुसरं लग्न गुप्त ठेवायचे आहे.
मुनव्वर फारुकीच्या लग्नामध्ये त्याची बेस्ट फ्रेंड आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान सुद्धा लग्नाला उपस्थित होती. हिना आणि मुनव्वर दोघेही खूप चांगले मित्र आहेत. नुकताच त्यांचा एक म्युझिक अल्बम व्हिडीओही रिलीज झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हिनाने मुनव्वरच्या लग्नाला हजेरी लावली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मेहजबीन पेशाने मेकअप आर्टिस्ट असून तिचं व्यावसायिक अकाऊंट इन्स्टाग्रामवर आहे. पण तिचं खासगी अकाऊंट इन्स्टाग्रामवर नव्हतं. पण मीडिया रिपोर्टनुसार, तिने निकाहनंतर इन्स्टाग्रामवर डेब्यू केलं आहे.
मुनव्वर फारुकीचे पहिले लग्न २०१७ मध्ये जॅस्मिनसोबत झाले होते. पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मुनव्वरला त्याच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे. त्याचा संभाळ स्वत: मुनव्वर करतो. मेहजबीनचं ही हे दुसरं लग्न आहे. तिला ही १० वर्षांची मुलगी असून तिचा सांभाळ करते.
हेही वाचा :
‘सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट…’, रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने खळबळ
‘अब तुम ही हो’ गाण्यावर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स : Video
चक्क PM मोदी यांचा भारताच्या कोचपदासाठी अर्ज? धोनी-सचिन अन् अमित शाह यांचंही नाव