शिंदे गटाला राष्ट्रवादीपेक्षा जास्त खाती मिळणार?, मोठी माहिती समोर

राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. 5 डिसेंबररोजी देवेंद्र (accounts)फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्तराकडे लागलं आहे. काही खात्यावरून भाजपा आणि शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. अशातच काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर झाल्याची माहिती आहे. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली आहे. त्यात शिवसेनेच्या वाट्याला कोणती खाती जाणार, याबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय.

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री मिळणार, यावर निर्णय झाल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची देखील एक बैठक पार पडली होती. खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती.यात राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय(accounts).मात्र, यावर अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या भाजपाच्या जिंकून आल्या आहेत. भाजप हा मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे भाजपाच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रीपदे जाणार, असं म्हटलं जातंय. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना किती मंत्रीपदे मिळणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.

शिवसेनेला जास्त मंत्रीपदे मिळणार की राष्ट्रवादीला?, याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. येत्या 11 व 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. मात्र, मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांची नावांवर चर्चा तसेच केंद्रातून मंजुरी या सर्व(accounts) प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. भाजपाकडून शिवसेनेच्या काही नावांना विरोध केला जात असल्याचं देखील म्हटलं जातंय.त्यामुळे सर्वांचंच लक्ष हे कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार, याकडे आहे.

त्यातच गृह खात्यावरून भाजपा आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वादात काय तोडगा निघणार, याकडे सर्वांची नजर असणार आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठं वक्तव्य केलं होतं. “तसं बघायला गेलं तर गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु, तसा काही हट्ट नाही. आजवर हे खातं आमच्याकडे राहिलं आहे.”, असं  फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर गृह खाते हे भाजपालाच मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा :

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार

एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य