अमेरिका पुन्हा WHO मध्ये सामील होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी पदाची सुत्रे हाती घेताच अनेक बड्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेला WHOच्या सदस्यात्वातून ट्रम्प यांनी बाहेर काढले होते. त्यांच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली होती. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोना काळात जबाबदारी योग्यरितीने पार न पाडल्याचा आरोप केला होता. दरम्यान पुन्हा एकदा यासंबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ते WHO मध्ये पुन्हा सामील होण्याचा विचार करतील असे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी अलीकडेच असे संकेत दिले आहेत की, अमेरिका पुन्हा एका जागतिक आरोग्य संघटना WHO मध्ये सामील होण्यावर विचार करु शकतो. सध्या 2026 पर्यंत अमेरिका WHO मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी WHOवर चीनला झुकते माप देण्याचा आरोप केला होता आणि या संघटनेला अमेरिकेच्या निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल दोष दिला होता. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे WHOवरील अमेरिकेच्या भूमिकेबाबत नवा मार्ग निघू शकतो.
सोमवारी (दि. 21 जानेवारी) व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या मते, WHO ने कोविड-19 महामारीच्या काळात चीनच्या भूमिकेबाबत निष्काळजीपणा केला. परंतु, WHO मध्ये पुन्हा एकदा अमेरिका सामील होण्याची शक्यता असून हा जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा विषय बनला आहे.

दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी सौदी अरेबियाकडून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे. सध्या सौदी अरेबियाने 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली आहे. मात्र, ट्रम्प यांनी पुढील चार वर्षांत ही रक्कम एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे.
सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी नुकत्याच झालेल्या चर्चेत अमेरिकन अर्थव्यवस्थेत मोठ्या गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीचा उपयोग अमेरिकेच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होईल. ट्रम्प यांच्या मते, सऊदीच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना चालना मिळेल आणि अमेरिकेच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व वाढेल. WHOबाबत पुन्हा विचार करण्याचा निर्णय आणि सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणुकीची मागणी यामुळे जागतिक आरोग्य आणि आर्थिक संतुलनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडू शकतो.
हेही वाचा :
आशा भोसले यांच्या नातीला डेट करतोय Mohammad Siraj? फोटो व्हायरल
अनिल अंबानींच्या पावलावर पाऊल? मुकेश अंबानींना बसला ‘इतक्या’ हजार कोटींचा झटका!
Budget आधी मोदी सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून लागू होणार UPS