उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून (incident)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात झालेल्या किरकोळ भांडणात एका महिलेने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि एका १४ वर्षांच्या मुलाचे प्रायव्हेट पार्ट दातांनी चावल्याचे समोर आले आहे. या अनपेक्षित आणि क्रूरतेमुळे 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वेदनेने ओरडला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, मुलाचे नशीब चांगले होते की, त्याने जाड पँट घातली होती, त्यामुळे त्याला कोणतीही गंभीर अंतर्गत दुखापत झाली नाही आणि मोठा अपघात टळला. सध्या अल्पवयीन मुलगा धोक्याबाहेर आहे. पण या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबात आणि संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

तंबाखू न दिल्याने तरुणाला आला राग, वादावादी झाली अन् नंतर रागातून हत्या झाली
किरकोळ भांडणात महिलेचा क्रुरतेचा कळस ही धक्कादायक घटना सामान्य भांडणादरम्यान घडली. पीडित मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्याचा गावातील एका महिलेशी कशावरून तरी वाद झाला होता. काही वेळातच प्रकरण इतके वाढले की, महिलेचा राग सुटला आणि तिने मुलाला घट्ट पकडले. तिने पुढे जे केले ते सर्वांना धक्का देण्याइतके होते… त्या महिलेने मुलाचे गुप्तांग दातांनी चावला. त्यानंतर मुलगा (incident)असह्य वेदनाने तडफडू लागला आणि त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक जमा झाले. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी कसे तरी त्या महिलेच्या तावडीतून मुलाला सोडवले.
मुलाची गंभीर प्रकृती पाहून कुटुंबीय खूप काळजीत पडले आणि त्यांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. प्रथमोपचार दिल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि सांगितले की मुलाचे नशीब होते की त्याने जाड पँट घातली होती, ज्यामुळे चावल्यानंतरही त्याला कोणतीही गंभीर अंतर्गत दुखापत झाली नाही. डॉक्टरांच्या मते, अल्पवयीन मुलगा आता धोक्याबाहेर आहे आणि औषधांच्या मदतीने हळूहळू बरे होईल.

या भयानक घटनेनंतर, पीडित मुलगा त्याच्या वडिलांसह थेट जिल्हा पोलिस अधीक्षक एसपी सोमेंद्र मीना यांच्या जनसुनावणी कार्यक्रमात न्यायाची याचना करण्यासाठी गेला. तिथे त्याने त्याची वेदनादायक कहाणी सांगितली आणि त्या महिलेवर कठोर कारवाईची मागणी केली. या महिलेने यापूर्वीही गावातील अनेक पुरुषांच्या गुप्तांगांवर हल्ला केला होता, परंतु प्रत्येक वेळी हे प्रकरण कसे तरी दाबले जात होते किंवा पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले नव्हते, असा धक्कादायक आरोप त्या मुलाने केला.
यावेळी, हे प्रकरण थेट एसपींसमोर आल्यानंतर, (incident)पोलिसांनी कारवाई केली आणि गांभीर्य दाखवत महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. माध्यमांशी बोलताना एसपी सोमेंद्र मीणा म्हणाले की, महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टला दातांनी चावल्याची तक्रार त्यांना मिळाली आहे, त्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हे अमानुष कृत्य करणाऱ्या महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा :
बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…
अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’
हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक
केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ