लोकांकडून घेतला जातोय महिलांचा बळी, धक्कादायक रिपोर्ट समोर

अहवालानुसार, आफ्रिकेतील प्रत्येक 100,000 महिलांपैकी 3 महिलांची त्यांच्या(nations)जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या केली जातेमहिलांसाठी सर्वात धोकादायक आणि असुरक्षित जागा म्हणजे त्यांचे स्वतःचे घर.असे मानले जाते.  पण आता त्याचे घरचं त्यांच्यासाठी सुरक्षित राहिले नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.याचे कारण म्हणजे युक्त राष्ट्रसंघाच्या दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर महिलांसाठी आता त्यांचे घरहीत्यांच्यासाठी सुरक्षित राहिले नाही, असा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या दोन संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात दररोज सरासरी 140  महिला आणि मुलींची त्यांच्याच साथीदारांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडूनच हत्या केली जाते. किंवा  कोणत्या ना कोणत्या प्रकारे या महिलांच्या हत्येसाठी हीच कुटुंबातील लोक त्यांच्या हत्येस जबाबदार असतात.युएन वुमेन, युएन ड्रग्ज अँड क्राईम 2023 च्या आकडेवारीनुसार, जगातील 51,100 महिला आणि मुलींच्या हत्येच्या प्रकरणात भागीदार किंवा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यच  जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. 2022 मध्ये अशी सुमारे 48,800 प्रकरणे नोंदवली गेली होती.  2023 ची आकडेवारी 2022 च्या तुलनेत जास्त आहे.

या दोन्ही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार,  महिला आणि मुलींना सर्वत्र लिंग-आधारित हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. आज जगभरातील प्रत्येक क्षेत्रात  महिलांना लिंग आधारित हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. यातील सर्वात धोकादायक परिस्थिती म्हणजे महिलांविरुद्ध त्यांच्या घरात होणारे गुन्हे.(nations) अशा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण  म्हणजे, कुटुंबातूनच अशा प्रकारचे अत्याचार होत असल्याने महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला शिक्षाही होत नाही.  त्यामुळे गुन्हेगारी प्रकरणांमध्ये घट होण्याऐवजी सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

यूएन वुमन आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या शक्तिशाली लोकांविरुद्ध एक मोहीम चालवत आहेत.  या मोहिमेच्या माध्यमातून शक्तीशाली लोकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या ताकदींचा उपयोग महिलांवर अत्याचार करण्यासाठी करू नये, यासाठी ही मोहीम चालवली जात आहे. आपल्याच कुटुंबातील आणि साथीदांराकडून होणाऱ्या अत्याचारांंच्या घटनांमध्ये आफ्रिकेचा पहिला क्रमांक लागतो. 2023 मधील आकडेवारीनुसार,(nations)  आफ्रिकेत महिला अत्याचाराची अंदाजे 21,700 प्रकरणे नोंदवली गेली.

हा आकडा आफ्रिकेच्या लोकसंख्येच्या संदर्भात पाहिला तर तो खूप जास्त आहे. अहवालानुसार, आफ्रिकेतील प्रत्येक 100,000 महिलांपैकी 3 महिलांची त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या केली जाते. गेल्या वर्षी अमेरिकेतील प्रत्येक 1 लाख महिलांपैकी 1.6 टक्क्  महिला हिंसाचाराला बळी पडल्या होत्या. ओशनियामध्ये  प्रत्येकी एक लाख महिलांमध्ये  1.5 टक्के महिलांता बळी गेला. अहवालानुसार, त्याचे दर आशियामध्ये खूपच कमी होते, जेथे 1 लाख महिलांमागे 0.8 बळी होते.

हेही वाचा :

आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!

MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा