महिलांनी डोळ्यात मिरची पूड फेकली नंतर टोळक्याने युवकाला कोयत्याने वार करत संपवलं

 शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.(chili powder) आता पंचवटी परिसर खुनाच्या घटनेने हादरला आहे. काल रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास किरकोळ कारणातून टोळक्याकडून युवकाची हत्या करण्यात आली आहे. विशांत भोये 29 असे मयत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पंचवटी परिसरातील आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील पंचवटीमध्ये काल रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास बिडी कामगारनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत भोये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी त्याठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्यासोबत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. 

त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयिताने विशांतला थेट कोयत्याने छातीवर वार केला. यावेळी विशांत जमिनीवर धारातीर्थ पडला. विशांतला त्याच्या मित्रांनी तत्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या छातीवर वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी (chili powder)त्यास मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाने यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी गावगुंडांना हटकले. यामुळे गावगुंडांना राग अनावर झाला. रागाच्या भारत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांनी दगडाने जबर (chili powder)मारहाण केली होती. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने गंभीर जखमी झाले होते. ऐन निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा आता राज्यभरात रंगली होती. 

हेही वाचा :

आज सोमवारी ‘या’ तीन राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा!

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या – चांदीच्या किंमती घसरल्या

‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

विधानसभा निकालाचा शेअर बाजारावर होणार परिणाम

मोठी बातमी! पंतप्रधानांविरुद्ध अटक वॉरंट जारी; नेमकं कारण काय?

महायुतीच्या महाविजयात ‘धर्मवीर २’चा मोलाचा वाटा…

कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला!