झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली(series) भाग्यश्री आणि कॉलेजच्या इंटर्नशिपमध्ये भेटलेला सुमेध – दोघांमध्ये जुळलेलं हे नातं आजही तितकंच खास आहे.
याबद्दल भाग्यश्री म्हणते, ‘सुमेध आणि माझी ओळख मी कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून इंटर्नशिप करत असताना झाली. इंट्रोडक्शन राउंडमध्ये जेव्हा त्याच्याबद्दल ऐकलं, तेव्हाच वाटलं, हाच तो माणूस ज्याच्यासोबत काम करायला मला आवडेल आणि खरंच, तिथूनच आमची मैत्री सुरू झाली.
सुमेधला मी पहिल्यांदा भेटले, तेव्हा तो थिएटरमध्ये आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत होता. (series) त्यामुळे त्याच्याशी बोलताना मला अभिनय, थिएटर, इंडस्ट्रीबद्दल खूप काही शिकायला मिळालं. मला आजही आठवतं, अभिनय करायचं असेल तर एकांकिका, नाटक हे किती महत्त्वाचं आहे, हे त्याच्यामुळेच कळलं.
‘सुमेध अतिशय पॅशनेट, गोल-ओरिएंटेड मुलगा आहे. इंटर्नशिपदरम्यान आम्ही एक शॉर्ट फिल्म एकत्र केली होती. तेव्हा त्याच्यासोबत काम करताना मला जाणवलं की हा माणूस फार क्लिअर आहे. त्याला नेमकं काय हवंय, हे कळतं. मला त्याचा अभिमान वाटतो… कारण मी त्याचा प्रवास जवळून पाहिलाय.
‘त्याच्या स्वभावात मला काही खटकत नाही; पण एक गोष्ट मात्र जाणवते, की सुमेध कामात इतका बुडतो, की स्वतःकडे दुर्लक्ष करतो. जबाबदाऱ्या, डेडलाईन्स आणि सतत चांगलं काहीतरी देण्याची धडपड यातून कधी-कधी स्वतःसाठी वेळच उरत नाही. पण त्याने थोडं बॅलन्स केलं तर उत्तम होईल, कारण आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.’
सुमेध सांगतो, ‘भाग्यश्री माणूस म्हणून खूपच खरी आहे. जी भावना तिच्या मनात असते, ती ती तोंडावर स्पष्ट (series) बोलते. आणि विशेष म्हणजे ती कायम सकारात्मक राहते. कितीही अडचणी असल्या तरी. एकच गोष्ट आहे जी मला फारसं आवडत नाही ती म्हणजे, भाग्यश्री अनेकदा स्वतःचे प्रश्न स्वतःच लढून सोडवते, त्यावर बोलत नाही. अर्थात यातूनच एक शिकण्यासारखी गोष्ट आहे – ती म्हणजे, कितीही कठीण प्रसंग असले, तरी ती कायम हसतमुख असते. तिचं हास्य हे तिचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे.’’
मैत्रीची एक आठवण सांगताना भाग्यश्री म्हणाली, ‘कॉलेजच्या दिवसांत आम्ही एक शॉर्टफिल्म केली होती. आम्ही माझ्या घरीच शूट करत होतो. त्यावेळी माझ्या घराजवळचे प्रसिद्ध समोसे मी सगळ्यांसाठी आणले; पण ते खाल्ल्यावर सुमेधची तब्येत बिघडली!
त्यानं शूट पूर्ण केलं; पण नंतर डॉक्टरकडे गेल्यावर कळलं, की त्याची तब्येत सामोशांमुळे नव्हे, काहीतरी इतर कारणामुळे बिघडली होती; पण ती घटना आजही आठवली की हसू येतं!’ सुमेध त्यावर म्हणतो, ‘त्या शूट दरम्यान जेव्हा माझी तब्येत बिघडली, त्या वेळी भाग्यश्रीनं आणि तिच्या बहिणीनं मिळून मला काळजीपूर्वक सांभाळलं. ती फिल्म कधीच पूर्ण झाली नाही; पण त्या शूटचे पाच दिवस आणि ती काळजी, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहील.’
मैत्रीची व्याख्या करत भाग्यश्री म्हणते, ‘माझ्यासाठी मैत्री म्हणजे एक नाजूक; पण खूप गहन नातं- जिथं शब्दांपेक्षा समज अधिक असतो. खरं मैत्रीचं नातं हे न बोलताही कायमच आपल्यासोबत असतं.’ सुमेध म्हणतो, ‘माझ्यासाठी मैत्री म्हणजे अनेक नात्यांचा संगम. एक खरा मित्र तोच – जो यशात शांतपणे टाळ्या वाजवत असतो; पण दु:खाच्या क्षणी सगळ्यात आधी आपल्या पाठीशी उभा राहतो.’
हेही वाचा :