कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचार रॅलीत वारकऱ्यांचा ‘धर्मदंड’

लोकसभेचे बिगूल वाजले आणि राज्यात सर्वच पक्षांचा प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. राज्यातील बारामतीनंतर ज्या जागेची सर्वाधिक चर्चा सुरू होती ती म्हणजे कोल्हापूरची. कोल्हापूरच्या जागेवरून महाविकास आघाडीने शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. शाहू महाराजांच्या प्रचार रॅलीत वारकऱ्यांचा राजदंड चर्चेचा विषय ठरला आहे.

शाहू महाराज यांच्या प्रचारासाठीदेखील रॅलीचं आयोजन

लोकसभा निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. राजकीय नेते मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभा, रॅली घेतल्या जात आहेत. यादरम्यान मविआकडून कोल्हापुरातील उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठीदेखील रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

अनेकांच्या भुवया उचवल्या

दरम्यान, शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील रॅलीत राजदंड आणण्यात आल्याचे दिसून आले. राजकीय कार्यक्रमात राजदंड आणण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उचवल्या. दरम्यान हा राजदंड प्रचार रॅलीत का आणला गेला? याची चर्चा सुरू असतानाच याबद्दल तो राजदंड रॅलीत घेऊन येणाऱ्या ग्रामस्थाने याबद्दल माहिती दिली.

हा धर्मदंड असून राजदंड म्हणून वापर

वारकरी सांप्रदायाशी संबंधित या ग्रामस्थाने सांगितले की, हा धर्मदंड असून राजदंड म्हणून याचा वापर होतो. राजे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने हा धर्मदंड रॅलीत वापरत आहोत आणि संपूर्ण सांप्रदाय राजेंच्या सोबत असल्याची आम्ही ग्वाही देत आहोत. निवडणुकीत कोल्हापूरचे राजे उतरले आहेत म्हणून आम्ही हा दंड वापरला आहे. इतर कुठलाही नेता उभा राहिला तर हा दंड वापरायचा नसतो. हा वारकरी सांप्रदायाचा धर्मदंड आहे. पूर्वीच्या राजे लोकांनी संरक्षण देऊन आमच्या भागवत धर्माची पताका उंच ठेवली असेही त्यामुळं हा राजदंड रॅलीत वापरल्याचे त्यांनी सांगितले.