अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा ‘सायलेंट स्ट्राइक’? अचानक दिल्ली गाठली, कारण…

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीचं नेमकं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नियोजित कार्यक्रमात स्वत: न जाता मंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना पाठवल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्यामागे काही महत्त्वाचे निर्णय, मंत्रिमंडळ विस्तार, किंवा आगामी राजकीय रणनीती यांसंबंधी हालचाली सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं असून, भाजप-शिंदे गटात काही नव्या समीकरणांची तयारी सुरू असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवू लागले आहेत. दरम्यान, या दौऱ्याबाबत अधिकृत निवेदन अथवा स्पष्टता देण्यात आलेली नाही.

एकनाथ शिंदेंच्या या अचानक दिल्लीतल्या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात(political ) काही मोठा बदल होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईत विधानभवनात गदारोळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गुपचूप दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. अधिवेशन चालू असताना ही धक्कादायक दिल्लीवारी चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्लीमध्ये त्यांनी भाजपच्या काही मोठ्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. पण, या गाठीभेटीचं नेमकं कारण काय?

या दौऱ्यावर अजूनही कोणतंही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेलं नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडालाय. राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं शिजतंय, हे नक्की! पुढील काही तास, काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या दिल्लीवारीतून महाराष्ट्राच्या राजकारणात(political ) मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :