सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या(employees) पगारात किती टक्क्यांनी वाढ होऊ शकते, याबाबत माहिती समोर आली आहे. एम्बिट या फर्मने ८व्या वेतन आयोगावर आपली इकॉनॉमी रिपोर्ट जारी केली आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. याचसोबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये किती टक्क्यांनी वाढ होणार याबाबत Ambit ने माहिती दिली आहे.
Ambitच्या रिपोर्टनुसार, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारत ३० ते ३४ टक्के वाढ होऊ शकते. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, आठव्या वेतन आयोगाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. भारतातील जीडीपी रेट वाढत आहेत. तरीही आठव्या वेतन आयोगाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ (employees)शकतो. याचा लाभ १.१२ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे.
एम्बिटच्या रिपोर्टनुसार, ७ व्या वेतन आयोगात सरकारने १४ टक्के पगारवाढ केली होती. यानुसार, ८ व्या वेतन आयोगात ३० ते ३४ टक्के वाढ होऊ शकते. जी एकूण खर्चाच्या १५.५ टक्के असू शकते.
एम्बिटच्या रिपोर्टनुसार, बेसिक सॅलरी ५०,००० रुपये आणि महागाई भत्ता ६० टक्के मोजला आहे. यानुसार,(employees) पगार १४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकार पगारात एकूण ५४ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.
जर फिटमेंट फॅक्टर १.८२ लागू झाला तर बेसिक सॅलरी ५०,००० रुपयांवरुन ९१००० रुपये होणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.१५ झाला तर १०७,५०० रुपये होणार आहे. याचशिवाय अनेक भत्तेदेखील मिळणार आहेत.
हेही वाचा :