सावधान! घरात, ऑफिसमध्ये प्लास्टिकचा वापर करताय? तर ही बातमी वाचाच

प्लास्टिक हे पर्यावरणपूरक नाही, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.(plastic)तरीसुद्धा अनेकजण पाणी पिण्यासाठी हमखास प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतात. प्रत्येक घरात वर्षानूवर्षे प्लास्टिकच्या डब्यात धान्य किंवा खाण्याचे पदार्थ स्टोअर केले जातात. पण काही काळानंतर त्या प्लास्टिकची एक्सपायरी डेट संपते अन् धोकादायक होते. गुणवत्ता खराब झाल्यामुळे प्लास्टिक बॉटल, डब्ब्यात असणाऱ्या पदार्थामुळे आरोग्यावर परिणाम होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल प्लास्टिकवरील ही एक्सपायरी डेट कुठे दिली जाते? ती कशी ओळखायची? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

प्लास्टिक ‘रेजीन’ या पदार्थाने बनवले जाते. जे काही काळानंतर निरूपयोगी होते. त्यामुळे कोणत्याही प्लास्टिकचा उपयोग किती काळासाठी केला पाहीजे याची माहीती असणे अत्ंयत महत्त्वाचे आहे. प्रत्येक बॉटल किंवा कंटेनरच्या खाली छोट्या त्रिकोणात एक विशिष्ट कोड दिला जातो.(plastic) हा कोड १ ते ७ मधील एक संख्या असते. ही संख्या म्हणजे त्या प्लास्टिकची एक्सपायरी डेट असते. प्लास्टिकची गुणवत्ता काय आहे, किती काळ ते वापरले जाऊ शकते? हे या कोडवरून समजते. या कोडला रेजीन आयडेंटीफिकेशन कोड म्हणतात. २, ४ आणि ५ मधील कोणतीही संख्या असल्यास ते प्लास्टिक दर्जेदार असतो. तसेच ७ ही संख्या असलेला प्लास्टिक सामान्य गुणवत्तेचा मानला जातो.

हे कोड प्लास्टिकची गुणवत्ताच नाही तर, त्याचा वापर कशासाठी होतो याचीही माहीती देतात. १ हा कोड कोल्ड्रींक, कंटेनर, ओव्हेन-ट्रे मध्ये तसेच डिटर्जन्ट आणि क्लिनर स्टोअर करण्यासाठीच्या प्लास्टिकमध्ये वापरला जातो. काहीकाळानंतर या प्रकारच्या प्लास्टिकमधून एन्टीमनी नावाचा पदार्थ रिलीज होतो.(plastic) हा आरोग्यासाठी अतिशय हानीकारक ठरतो. यामुळेच हा कोड असलेला प्लास्टिक पुन्हा पुन्हा वापरू नये. हे प्लास्टिक फक्त एकदाच वापरावे.

२, ४ आणि ५ संख्या असलेला कोड शक्यतो खाद्यपदार्थांचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉटलवर पाहायला मिळतो. शिवाय ५ हा कोड मायक्रोव्हेव किंवा ओव्हेनमध्ये जेवण गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांसाठी असतो. या प्लास्टिकला रिसायकल देखील केले जाऊ शकते. तसेच प्लम्बिंग पाईप्स, खेळणी, माऊथ वॉश किंवा शॅम्पूच्या बॉटल्ससाठी ३ ही संख्या असलेला कोड वापरला जातो. तर चहाचे कागदी कप, अंडी ठेवायचे कार्टन्स, प्लेट्स आणि बाइक हेल्मेट मध्ये ६ हा कोड वापरला जातो. उष्णतेच्या संपर्कात आल्यास यातून विषारी पदार्थाचा स्त्राव होतो. म्हणूनच चहा पिण्यासाठी असलेले कागदी कप वापरण्यास मनाई केली जाते.

हेही वाचा :