आयुष्यात अनेकदा अपयश येते. परंतु कितीही अपयश आले तरीही खचून जायचं नाही. नवी सुरुवात करायची (times)आणि जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करायचे. असंच काहीसं मृदुपाणी नंबी यांच्यासोबतही झालं. त्यांना फक्त एका गुणामुळे अपयश मिळाले होते. परंतु त्या खचल्या नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी शेवटी यूपीएससी परीक्षा पास केलीच.
मृदुपाणी नंबी यांना खूप कमी वयात यश मिळाले. यूपीएससीच्या प्रिलियम्समध्ये पहिल्याच प्रयत्नात अपयश आले तरीही (times)त्यांनी प्रयत्न सोडले नाही. फक्त एका गुणामुळे त्यांचे सिलेक्शन राहिले. त्या रडत राहिल्या नाहीत. त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले.
मृदुपाणी यांनी या अपयशामुळे स्वतः ला वचन दिलं की, त्या फक्त आपल्या ध्येयावर लक्ष देतील. त्यांनी स्वतः ला फोनपासून दूर ठेवलं. त्यांनी मोठ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी UPSC IES मध्ये ऑल इंडिया रँक २१ मिळवली.
२०२० मध्ये मृदुपाणी यांनी IES परीक्षा दिली. फक्त १ मार्काने ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही. परंतु त्यांनी आपल्या याच (times)अपयशाला यशात बदलवून टाकलं.
मृदुपाणी यांनी खूप मेहनतीने यश मिळवले. त्यांनी २०२२ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २१ वी रँक मिळवली. त्यांनी कम्युनिकेशन मंत्रालयात आयईएस अधिकारी म्हणून निवड झाली.
दहावीत फक्त ५७ टक्के, कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यास नकार, मोठ्या जिद्दीने IAS झाला, वाचा आकाश कुल्हारी यांचा प्रवास
मृदुपाणी यांचे शिक्षण
मृदुपाणी यांनी जी नारायणम्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्समधून बीटेक केलं. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :
- या राशीची होणार पगारवाढ, या राशीचा वाढणार मानसन्मान, तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते ?
- कबड्डी दिनाच्या रौप्य महोत्सवात सोनेरी आठवणींना उजाळा ; राम घोडपेंना जीवनगौरव; विठ्ठल देवकाते, शकुंतला खटावकर, चंद्रकांत काटे यांचाही सन्मान
- सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार