महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाची (rain )शक्यता वर्तवली गेली असून हवामान खात्याने विदर्भ व मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा(rain ) जोर वाढताना दिसतो आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असून, काही भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशा स्थितीत आज विदर्भ आणि मराठवाडा विभागात मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज नांदेड, लातूर, धाराशिव यांसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जाणवण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातही पावसाचा(rain ) अंदाज वर्तवण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत हवामान अधिक ढगाळ राहू शकते, तर काही ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
राज्यात पेरणीच्या कामांमध्ये अडथळे येत असताना आजचा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळू शकते. मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तासांत आकाश ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हवामानात आर्द्रता अधिक राहील.
हेही वाचा :