मुंबई- स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या हे पात्र प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडत आहे.(serial) अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने या पात्राची उत्तम पकड साधली आहे. ज्ञानदाने यापूर्वी स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून अपूर्वा वर्तक कानिटकर या पात्रातून प्रेक्षकांची मन जिंकलेली. आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ज्ञानदाचा प्रमुख भूमिका असलेला मुंबई लोकल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मालिकेचं शूटिंग, सिनेमाचा शूटिंग, त्याचा प्रमोशन या सगळ्या गोष्टी एकत्र हाताळणे म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकरसाठी एक प्रकारे तारेवरची कसरत झाली आहे. याशिवाय सध्याचं पावसाळी वातावरण यामुळे सुद्धा अनेक साथीचे आजार पसरताना पाहायला मिळतात. याचा फटका ज्ञानदाच्या तब्येतीला बसला आहे. ज्ञानदाने नुकतीच सोशल मीडियावर एक(serial) पोस्ट शेअर करून आपल्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली आहे.
ज्ञानदाने शेअर केलेल्या फोटोत तिच्या हाताला सलाईनची ड्रीप असल्याचे पाहायला मिळते. त्यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले- मुंबई लोकलचं प्रमोशन आहे, ज्ञानदा कुठे आहे? 200 एपिसोडच सेलिब्रेशन आहे, काव्या कुठे आहे…? तुमची अप्पू, काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडासा आराम घेतेय. गेले काही दिवस व्हायरल फिवर सोबत भांडण चालू आहे. पण लवकरच(serial) परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हाला सर्वांना एंटरटेन करायला मी येतेय. तुमचं प्रेम, आशीर्वाद, माझ्यासोबत व माझ्या सर्व प्रोजेक्ट सोबत ठेवाल याची मला खात्री आहे. मुंबई लोकल 1 ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपटगृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम रोज 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर…
दरम्यान ज्ञानदा रामतीर्थकरच्या मुंबई लोकल या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ती अभिनेता प्रथमेश परब सोबत पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन चालू होतं. सिनेमाचं नावच मुंबई लोकल असल्यामुळे त्यांनी खास खऱ्याखुऱ्या मुंबई लोकलमध्ये जाऊन सिनेमाचं हटके प्रमोशन केलं. याशिवाय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या आणि पार्थ घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना पाहायला मिळत आहे. मात्र त्यासाठी आता त्यांना 6 महिने वाट पहावी लागणार आहे . या सहा महिन्यांच्या कालावधीत दोघांचं नातं कसं बदलत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा :