स्लिम आणि फिट राहायच आहे? मूग डाळ चाट नक्की ट्राय करा!

मूग डाळ ही प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. मूग डाळीचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी आपला पोट(Definitely)जास्त काळासाठी भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. याचा परिणाम म्हणजे तुम्ही प्रमाणात जेवण करता आणि वजन नियंत्रित राहायला मदत होते.अशीच एक मूग डाळीच्या चाटची रेसिपी पुढे दिली आहे, ज्यामुळे तुमची वेट-लॉस जर्नी सुरळीत होऊ शकते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी, पौष्टिक आणि सगळेजण आवडीने खातील अशी ही रेसिपी लगेच लिहून घ्या.

मूग डाळ चाट बनवण्यासाठीचे साहित्य
मूग डाळ, पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची,बारीक चिरलेला टोमॅटो, (Definitely)बारिक चिरलेली काकडी, कोथिंबीर, कैरी पर्यायी, डाळिंबाचे दाणे पर्यायी, शेव, लिंबू, मीठ आणि मिरपूड

मूग डाळ चाट बनवण्याची कृती
सर्वात आधी मूग डाळ धुवून घ्या. नंतर एका भांड्यात डाळ भिजेल एवढे पाणी घेऊन पाच तास किंवा रात्रभर डाळ भिजत ठेवा. (Definitely)आता भिजवलेली मूग डाळ १५ मिनिट वाफवून घ्या. तोपर्यंत एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कैरी आणि डाळिंबाचे दाणे घाला. त्यात आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरपूड घाला. नंतर त्यात वाफवलेली मूग डाळ घालून सगळं एकत्र करून घ्या. तयार झालेलं हे चाट एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर शेव घाला आणि लिंबू पिळा आणि या चविष्ट अन पौष्टिक मूग डाळ चाटचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :