ट्रम्प यांच्याशी पंगा अन् एकाच दिवसात अरबो रुपये पाण्यात; एलॉन मस्क यांच्या टेस्टाला मोठा फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Trump )आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांचे संबंध ताणले असून त्याचा फटका एलॉन मस्क यांच्या टेस्लाला सहन करावा लागला आहे. मस्क यांच्या एकूण संपत्तीतही घट झाली आहे. तसेच, त्यांच्या कंपनी टेस्लाचे शेअर्सही एकाच दिवसात कोसळले. शेअर्समध्ये १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार, टेस्लाचे मालक एलोन मस्क यांच्या एकूण संपत्तीत एका दिवसात ३३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच २९,०७,४२,३३,३०,००० रुपयांची घट झाली. एलोन मस्क यांची एकूण संपत्ती ३३५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. मस्क यांच्या कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. टेस्लाचे शेअर्स १४.२६ टक्क्यांनी घसरून २८४.७० डॉलर्सवर खाली आले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात ४७.३५ डॉलर्सची घसरण झाली आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Trump ) यांनी एलोन मस्क यांना सरकारमध्ये सामील करून घेतलं. मात्र अल्पावधितच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. ट्रम्प सरकारने आणलेल्या बिग ब्युटीफुल बिलाला मस्क यांनी विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर मस्क यांच्या विरोधात पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, त्यांना अजूनही व्हाईट हाऊसची आठवण येते.

मस्क यांना ट्रम्प डिरेंजमेंट सिंड्रोम आहे. यानंतर मस्क यांनीही ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांना २०२४ ची अध्यक्षीय निवडणूक जिंकता आली नसती. डेमोक्रॅटीक पक्षाने व्हाईट हाऊस काबीज केले असतं आणि रिपब्लिकनना सिनेटमध्ये फक्त ५१-४९ मते मिळाली असती, असा दावा केला आहे.

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील सोशल मीडियावरील वाकयुद्ध भारतीय वेळेनुसार दुपारी १ ते २ दरम्यान सुरू झालं. त्यावेळी अमेरिकन बाजारात व्यवहार सुरू होते. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्यात सुरू वाकयुद्धाचा परिणाम टेस्लाच्या शेअर्सच्या घसरणीत दिसून आला. टेस्लाचे शेअर्स एका दिवसात सुमारे १५ टक्क्यांनी घसरले. बाजार बंद होईपर्यंत, टेस्लाचे शेअर्स सुमारे $४८ ने घसरून $२८४.७० वर बंद झाले.

हेही वाचा :