अल्पवयीन प्रेयसीचा जीव घेणाऱ्या अभिनेत्याला मृत्यूदंड; जगात पहिल्यांदाच असं घडलं…

कलाविश्व, कलाकार, त्यांचं पडद्यावरचं आणि खासगी आयुष्य यांमध्ये असणारी तफावत या सर्व गोष्टी कायमच चर्चेचा विषय ठरतात. किंबहुना कलाकारांच्या खासगी जीवनाविषयी चाहत्यांच्या मनात कायमच कुतूहल पाहायला मिळतं. पण, सध्या मात्र एक अशी विचित्र माहिती समोर आली आहे, ज्यामुळं अनेकांचा या वृत्तावर विश्वासच बसत नाहीये. कारण जगभरात अशी एखादी घटना पहिल्यांदाच घडत असावी, जिथं चक्क एका अभिनेत्याला(Actor ) प्रत्यक्ष आयुष्यात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

ज्या कलाकाराविषयी सध्या चर्चा सुरू आहे, तो कोणी भारतीय अभिनेता नसून, हा चीनमधील अभिनेता(Actor ) असल्याचं सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याप्रकरणात त्याला शिक्षा होत असल्याचं म्हटलं जात असून चीनमधील समाजमाध्यमांवर या निकालानंतर अनेक मतमतांतरं पाहायला मिळत आहेत.

ही खळबळजनक घटना 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2022 ला चीनमधील शिंगपिंग शहरात घडली होती. या घटनेमुळं संपूर्ण देशच हादरला होत, जिथं 33 वर्षीय अभिनेता(Actor ) झांग यियांग याला गुन्हासाठी दोषी ठरवण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार झांगनं त्याच्या 16 वर्षीय प्रेयसीला वाढदिवसाचं निमित्त सांगत एका निर्मनुष्य वनक्षेत्रात बोलवलं. तिथं दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला आणि हा वाद नातं तुटण्यापर्यंत पोहोचला.

वादादरम्यान मुलीनं ज्या क्षणी नात्यात इथंच थांबण्याचा विषय काढला तेव्हा झांगला संताप अनावर झाला आणि त्यानं प्रेयसीवरच चाकूनं सपासप वार करत तिचा जीव घेतला. मुलीच्या मानेवर वार केल्यामुळं तिची श्वसननलिका आणि रक्तवाहिनी तुटून तिचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर झांगनं या प्रकरणाला आत्महत्येचा प्रकार भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो अपयशी ठरला.

 

सरतेशेवटी पोलिसांनी झांगला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू झाली. अनेकांना यामुळं धक्का बसला की चीनच्या कलाविश्वात झांग एक नवोदित कलाकार असून मालिका आणि वेब सीरिजमध्ये तो झळकला होता. दरम्यान झालेली घटना ही जाणिवपूर्वक करण्यात आलेली हत्या असल्याचं निरीक्षण न्यायालयानं अधोरेखित करत झांगला ‘इंटेंशनल होमिसाइड’ ठरवलं आणि सर्व याचिका आणि आवाहनं फेटाळल्यानंतर झांगला 18 डिसेंबर 2024 ला गोळी झाडून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

झांगला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर सोशल मीडियावर वेगळाच वाद डोकं वर काढताना दिसला. अनेकांनी झांगच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले तर, काहींनी नात्यांकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याचाही मुद्दा मांडला. न्यायालयानं दिलेली ही शिक्षा पाहता चीनमधील कठोर न्यायव्यवस्था आणि शिक्षेची तातडीनं होणारी अंमलबजवणी या मुद्द्यामवर प्रकाश टाकते. जिथं अल्पवयीन मुलांव होणाऱ्या अत्याचारांविरोधात कायदा अधिक कठोर असल्याचं स्पष्ट होतं.

हेही वाचा :