अमेरिकेचा मोठा दणका; डोनाल्ड ट्रम्प देणार हजारो नागिरकांना हाकलून

वॉशिंग्टन: अमेरिकेचे(America ) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून देशातून बेकायदेशी परदेशी नागरिकांची हाकलपट्टी करत आहेत. अफगाणिस्तान, इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांसारख्या मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली आहे. आता अमेरिकेने भारताच्या शेजारी देश नेपाळबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांनी नेपाळला दिलेले हद्दपारी संरक्षण रद्द केले आहे. यानिर्णयामुळे अमेरिकेतील ७ हजार ५०० विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार आहे. न्यूजवीकने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशानाने नेपाळधील परिस्थीती आता २०१५ सारखी राहिलेली नाही असे सांगून नेपाळचे संरक्षण रद्द केले आहे. नेपाळमधील भूकंपामुळे अमेरिकन सरकारने नागरिकांना सुरक्षा प्रदान केली होती. पण आता ही सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

अमेरिकेत(America ) हद्दपारी संरक्षण मुद्द्याला टेम्पोररी प्रोटेक्टेड म्हणजे टीपीएस म्हणले जाते. याअंतर्गत अमेरिकन सरकार नेपाळमधील वाईट परिस्थितीत अमेरिकेत राहू इच्छिणाऱ्या नागरिकांना सुरक्षेची हमी देतात. हद्दपारीच्या संरक्षणाखाली दुसऱ्या देशातील लोकांना अमेरिकेत काम करण्याचा अधिकार मिळतो. अमेरिकन नागरिकत्व दिले जात नाही. मात्र ट्रम्प यांनी सत्तेत येताच आता कोणत्याही देशाला अशी सुरक्षा दिली जाणार नाही अशी घोषणा केली आहे.

यामुळे हद्दपारी संरक्षणाखाली अमेरिकेत राहणाऱ्या ७ हजार ५०० नेपाळी लोकांना मायदेशी परतावे लागणार आहे. नागरिक परतले नाहीत तर त्यांना जबरदस्तीने देखील हद्दपार केले जाऊ शकते.

दोन दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी १२ देशातील लोकांच्या अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली होती. ट्रम्प यांच्या मते, परदेशी लोक त्यांच्या देशात दहशतवाद पसरवत आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड कॉंगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे. चाड सोडून इतर देशांनी अद्याप ट्रम्प यांच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण चाडने ट्रम्प यांच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या देशात प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चाडचे प्रमुखांनी, आम्ही आमचा स्वाभिमान विकून अेरिकेशी बोलू शकत नाही असे म्हटले आहे. चाडच्या राष्ट्रपतींनी कतारकडून मिळालेल्या ट्रम्प यांच्या भेटवस्तूचाही उल्लेख केला आहे.

ट्रम्प(America ) यांची असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्येही ट्रम्प यांनी इमिग्रेशन लागू करण्याचा प्रयत्न केला होता. इराक, येमेन, सीरिया, सोमालिया, इराण, सुदान आणि लिबिया या मुस्लिम देशातील लोकांवर ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेशाला बंदी घातली होती. परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय बदलण्यात आला.

हेही वाचा :