सतत काम, आहारात होणारे बदल, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे (regularly )इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात थकवा वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला थकवा बऱ्याचदा अनेक गंभीर आजारांचे संकेत आहेत. त्यामुळे थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थकवा अशक्तपणा सुटका मिळवण्यासाठी द्राक्षांचा शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. द्राक्ष खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचा आणि आरोग्य सुधारते. संध्याकाळच्या वेळी थकून घरी आल्यानंतर तुम्ही झटपट द्राक्षांचा शेक बनवू शकता. (regularly )तुम्ही बनवलेला हा शेक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया द्राक्षांचा शेक बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
द्राक्ष लाल, हिरवी
दूध
व्हॅनिला आईस्क्रीम
साखर
बर्फाचे तुकडे
पुदिन्याची पाने
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
कृती:
द्राक्षांचा शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम,(regularly ) द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे मधून दोन तुकडे करा.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केले द्राक्ष, दूध आणि व्हॅनिला आईस्क्रीम, बर्फाचे ३ खड्डे घालून बारीक पेस्ट तयार करा.
तयार केलेला शेक काचेच्या ग्लासात ओतून पिण्यासाठी सर्व्ह करा.
सजावटीसाठी तुम्ही पुदिन्याची पाने आणि द्राक्षांचे बारीक केलेले तुकडे वापरू शकता.
द्राक्षांचा शेक तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर करू शकता.
हेही वाचा :