भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी मोठी आनंदवार्ता दिली आहे.(Customers ) ग्राहकांना अधिकाधिक सेवा एकाच प्लॅनमध्ये मिळाव्यात, यासाठी एअरटेलनं आता काही खास सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधांचा लाभ तुम्ही एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून सहज घेऊ शकता सध्या देशभरात एअरटेलचे ३८ कोटींहून अधिक ग्राहक असून, कंपनीने विविध कॅटेगरीमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये आता काही सेवा बिलकुल मोफत मिळणार असल्याने युजर्सचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
एअरटेलनं दिलेल्या माहितीनुसार, काही निवडक रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिज्नी+ हॉटस्टार आणि सोनी लिव्ह यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सबस्क्रिप्शन पूर्णपणे विनामूल्य मिळणार आहे. उदाहरणार्थ, ₹279, ₹598, ₹1729 आणि ₹1798 रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना नेटफ्लिक्सचा मोफत लाभ मिळतो.(Customers ) तर अमेझॉन प्राइमसाठी ₹838 किंवा ₹1199 चा रिचार्ज आवश्यक आहे. यासोबतच, ₹398, ₹451 आणि ₹195 यांसारख्या प्लॅनमध्ये डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनही दिलं जात आहे.
याशिवाय एअरटेलनं नुकताच आणखी एक जबरदस्त लाभ दिला आहे. AI-आधारित Perplexity Pro हे सर्च इंजिन, ज्याची बाजारात किंमत ₹17,000 आहे, ते सर्व एअरटेल ग्राहकांसाठी एक वर्षासाठी मोफत करण्यात आलं आहे.ही ऑफर 17 जुलै 2025 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान उपलब्ध असून, यासाठी एअरटेल थँक्स अॅपमध्ये लॉगिन करून ‘Perplexity Pro’ अॅक्सेस करता येईल.
जर तुम्ही 5G स्मार्टफोन वापरत असाल, तर एअरटेलकडून मिळणारा Unlimited 5G डेटा सुद्धा एक जबरदस्त आकर्षण आहे.(Customers ) काही खास प्लॅन्स – ₹1798, ₹1199, ₹1029, ₹979, ₹838, ₹449 आणि ₹398 – यामध्ये तुम्हाला कोणत्याही मर्यादेशिवाय 5G इंटरनेट वापरता येणार आहे.एअरटेलच्या या नव्या ऑफर्समुळे ग्राहकांना आता एकाच रिचार्जमध्ये मनोरंजन, इंटरनेट, सर्च टेक्नॉलॉजी आणि अनलिमिटेड डेटा अशा सर्व सेवा मिळणार आहेत. त्यामुळे युजर्सचा खर्च वाचणार असून मोबाईलचा अनुभव अधिक दर्जेदार होणार आहे.
हेही वाचा :