अभिनेत्री उर्फी जावेदची विचित्र फॅशन अनेकदा चर्चेचा विषय ठरली.(fashion ) पण आता अभिनेत्री खुशी मुखर्जी देखील त्याच वाटेवर चालताना दिसतेय. काही दिवसांआधी खुशी कपूरचा ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामुळे ती ट्रोल झाली होती.त्यानंतर आता पुन्हा एकदा खुशी एक विचित्र ड्रेस घालून लोकांसमोर आली. तिचे कपडे पाहून लोकांनी तिला अश्लील म्हटलं आहे. तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खुशी मुखर्जीने एक रिव्हिलिंग टॉप वेअर केला आहे. ज्यात चेस्टजवळ हातांचं डिझाइन तयार करण्यात आलं आहे. त्यावर तिने स्किन फिट जिन्स वेअर केली आहे जी मागून फाटली आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम अनेक जणांनी शेअर केला आहे.(fashion )व्हिडिओमध्ये पापाराझी खुशीला विचारतात, तुम्ही जेवले का? त्यावर खुशी पापाराझींशी बोलते, मी जेवण ऑर्डर केलं आहे. ते खाण्यासाठी बाहेर निघाली आहे.
खुशीच्या या ड्रेसमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. . एका युजरने लिहिलंय,”एखाद्या वकिलाला विचारा तिच्याविरुद्ध अश्लीलतेचा खटला दाखल करता येईल का?” दुसऱ्यानं लिहिलंय, लाजही वाटत नाही, कसे कपडे घातले आहेत.”(fashion )अशा अनेक प्रतिक्रियांमध्ये तिच्या लूकवर टीका होत आहे आणि काही युजर्सनी संस्कृतीचे नाव घेत तिचा विरोध केला आहे.
खुशी मुखर्जी बद्दल सांगायचं झाल्यास, ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने Anjal Thurai या तमिळ सिनेमातून पदार्पण केलं.ती हर्ट अटॅक आणि डोंगा प्रेम या सिनेमांमधील दिसली आहे. तिने बालवीर रिटर्न्स, एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला आणि लव्ह स्कूल सारख्या टेलिव्हिजन कार्यक्रमातही तिनं काम केलं आहे.
हेही वाचा :