देशात कोरोनाचा(Corona ) संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी लोक वेगाने बरे होत आहेत. देशभरात मागच्या 24 तासांमध्ये 4 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे चिंता वाढत असली तरी रूग्ण बारे होण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 64 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर एक जानेवारी 2025 पासून आजपर्यंत तब्बल 120 रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तर कोरोना संक्रमित झालेले 6 महिन्यातील एकूण सखी 18,256 इतकी आहे.
सध्या देशात करोना(Corona ) झालेल्या रूग्णांची संख्या 5,608 इतकी असल्याचे समजते आहे. बाकी सर्व रूग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 1,807 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्यात सर्वाधिक करोना रूग्ण सापडत असल्याचे समोर आले आहे.
देशातील इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. महाराष्ट्रात आज ५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, महाराष्ट्रात एकूण मृतांची संख्या २७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासोबतच, केरळमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या २००७ आहे, तर गुजरातमध्ये १४४१ पॉझिटिव्ह रुग्ण आणि पश्चिम बंगालमध्ये ७४७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत
केंद्रीय आरोग्य विभागकडून अधिकृत संकेकस्थळावर दररोज कोरोनाची माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये कोरोनाची सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजारांच्या पुढे गेली आहे. रविवार (दि.15) रोजी देशामध्ये 7383 रुग्ण सक्रीय आहेत. यामध्ये आतापर्यंत 12,915 रुग्मांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे दिल्ली, केरळ आणि गुजरातमध्ये सक्रीय आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या सक्रीय रुग्ण 578 आहेत. कालापासून 35 रुग्ण बरी झाली आहेत. त्याचबरोबर 1 जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 1 हजार 362 रुग्ण आढळली आहेत. तर जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी जबलपूरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू कशामुळे झाला यासाठी काही तपासणी केली असता त्या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाले असल्याचे समोर आले आहे. देशभरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तथापि, यातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. देशात सध्या 7 हजरांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 99 वर पोहोचली आहे.
हेही वाचा :